Mumbai, 21 May : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची नावे वगळण्यात आली होती. त्याची संपूर्ण राज्यात चर्चा झाली. पण त्याच दिवशी पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी ट्टिट करत ती क्लेरिकल चूक असून लवकरच यादीत दुरुस्ती करण्यात येईल, असे म्हटले होते. ती राष्ट्रीय कार्यकारिणी कधी दुरुस्त होणार?, याची उत्सुकता असतानाच खुद्द खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रीय कार्यकारिणी येत्या चार ते पाच दिवसांत दुरुस्तीचा निर्णय होईल, असे स्पष्ट केले आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावे नसलेली राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली होती. पण त्यावर गदरोळ उठल्यानंतर ती दुरुस्त करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्याबाबत तटकरे म्हणाले, येत्या चार ते पाच दिवसांत पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दुरुस्तीचा निर्णय होईल.
सुनेत्रावहिनी (Sunetra Pawar) यांनीच राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ते ट्विट केले हेाते. त्यावर आमची चर्चाही झाली होती आणि कशा पद्धतीने पुढील वाटचाल करायची, याचा निर्णय झाला आहे. आता त्या प्रक्रियेसाठी जो कालावधी लागतो, तो कालावधी घेतला जाईल. पण आता पक्ष एकसंघपणाने कामाला लागला आहे.
झिशान सिद्दिकी यांचा फार्म भरला, त्या वेळी राष्ट्रीय अध्यक्ष ‘ए’ फार्म सही करून देत असतात. बी फार्मवर सही करण्याचा अधिकार कोणाला? त्या वेळी प्रदेशाध्यक्ष म्हणून मला तो देण्यात आला होता. सिद्दिकी यांच्या अर्जाला जोडण्यासाठी बी फार्मवर प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी सही आहे. त्यामुळे तो व्हॉलिड आहे, त्यात कोणतीही तांत्रिक अडचण नाही. आमदारकी धोक्यात येण्याचा काही भाग नाही. पण काही वेळा सेप्युकलेशन होत असतात. ते होत राहतील, किती बाबींचा खुलासा करायचा. त्याची उत्तरं काळाच्या ओघात मिळत असतात, असेही तटकरे यांनी नमूद केले.
खासदार तटकरे म्हणाले, सुनेत्रा पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, पार्थ पवार आम्ही सर्वजण एकत्र बसून तो विषय आम्ही पूर्णपणे संपवलेला आहे. त्या कोणताही संदेह राहिलेला नाही. आम्ही संपूर्ण ताकदीने संघटनेच्या कामाला लागलो आहोत.
मी सगळं वाचलं आहे. मी वाचलं नाही, असं तुम्ही कसं म्हणू शकता. माझाही ४२ वर्षांचा प्रवास आहे, असं सगळं वाचत वाचतच या दिवसांपर्यत आलो आहे. नाही तर इथंपर्यंत कसा पोचलो असतो. मी मागच्या मार्गाने नाही तर निवडून आलो आहे. त्यामुळे मी ते सर्व कागद वाचले आहेत. त्या कागदाची व्यवस्थितरित्या चर्चा झाली आहे. निवडणूक आयोगाला जे काही पत्र पाठवायचं आहे, ते लवकरच पाठवलं जाईल. त्याबाबतच कोणताही समज, गैरसमज राहिलेला नाही, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले.
सुनील तटकरे म्हणाले, संजय शिरसाट हे कोणत्या माहितीच्या आधारे ते बोलले आहेत, हे आम्ही एकत्र आल्यानंतर विचारू. आम्ही ऑपरेशन तुतारी वगैरे काही राबवत नाही. अजितदादांच्या काळात विलिनीकरणाची चर्चा एका टप्प्यापर्यंत गेली होती. त्यानंतरसुद्धा काही घडामोडी घडल्या. विलिनीकरणाबाबत खासदार सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.