Sunil Tatkare : ‘त्या’ वादावर सुनील तटकरे अखेर बोलले : कोण म्हणतंय मी नाराज आहे? पार्थ पवारांबाबत तक्रार असण्याचं कारणच काय?

NCP Political News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी नसल्याचे स्पष्ट करत सुनील तटकरे यांनी पार्थ पवार आणि जय पवारांविरोधात कोणतीही तक्रार नसल्याचे सांगितले.
Sunil Tatkare-Parth Pawar
Sunil Tatkare-Parth PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 21 May : मी नाराज होतो, असं कोण म्हणतंय? मी आजही नाराज नाही, उद्याही नसणार आहे आणि भविष्यातही नाराज होण्याचे कोणतेही कारण नाही. पक्ष चालविताना अनेक प्रश्न निर्माण होत असतात. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लोकशाही असून आम्ही सगळेजण बसून चर्चा करत असतो. चर्चेतून त्यावर तोडगा निघत असतो. पार्थ पवारांबाबत तक्रार असण्याचे कोणतेही कारण नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मृत्यूनंतर पार्थ आणि जय पवार सक्रीय राजकारणात आले आहेत, त्यामुळे त्यांच्याबाबत तक्रार असण्याचे कारणच काय, असा सवाल खासदार सुनील तटकरे यांनी उपस्थित केला.

राष्ट्रीय अध्यक्षांचे अधिकार कार्याध्यक्षांना देण्याबाबतचे पत्र, कथित ऑडिओ क्लिप आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत खासदार प्रफुल पटेल आणि तटकरे यांचा समावेश नसणे, याबाबत उठलेल्या वादळावर खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी भाष्य केले.

ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासूनचा मी कार्यकर्ता आहे. अजितदादांच्या (Ajit Pawar) नेतृत्वाखाली २०२३ मध्ये एनडीएसोबत जाण्याच्या महत्वाच्या निर्णयाचा मी घटक आहे. ते घडण्यापूर्वी आणि घडल्यानंतर, जागा वाटप, निवडणुकीत यश या सर्वामध्ये मी एक प्रमुख घटक आहे, त्यामुळे मी नाराज असण्याचे कोणतेही कारण नाही.

मी कधीही नाराज नव्हतो. आजही नाही आणि उद्याही नसणार आहे. पक्ष चालविताना अनेक प्रश्न निर्माण होत असतात. चर्चेतून त्यावर तोडगा निघतो, राष्ट्रवादी शिव-शाहू-फुले-आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. आमच्या पक्षात लोकशाही आहे. आम्ही सगळेजण बसून चर्चा करत असतो. अशावेळी आपापली मते सर्वजण मांडत असतात. पण जे काही निर्णय होतात, ते सर्व एकमताने होतात, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

Sunil Tatkare-Parth Pawar
Satara Sangli MLC: विधानपरिषदेसाठी साताऱ्यात मोठी घडामोड; उदयनराजे अन् गोरेंनी घेतली CM फडणवीसांची भेट; सुचवली वेगवेगळी नावं

ते म्हणाले, अलीकडच्या काळात शरद पवार यांची भेट झाली नव्हती. त्यांना वारंवार रुग्णालयात दाखल करावं लागत होतं. त्यामुळे त्यांच्या तब्येतीच विचारपूस करण्यासाठी भेटीची वेळ मगितली होती. मधल्या काळात ती मिळाली नव्हती, पण त्या दिवशी ती मिळाली. दहा मिनिटे चर्चा झाली. त्यात साहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. आमच्या पक्षांतर्गतची चर्चा होण्याचे कोणतेही कारण नाही.

शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, ते समाजातील सर्वच घटकांतील कार्यकर्त्यांशीही चर्चा करत असतात. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष आहे, त्यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, त्यामुळे कोणाबद्दल तक्रार करण्याचा विषयच उपस्थित होत नाही, असे सुनील तटकरे यांनी नमूद केले.

तो पवारांचा अधिकार

ते म्हणाले, शरद पवारांनी कोणाला सल्ला द्यावा, हा त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीतून मिळविला आहे. मी प्रदेशाध्यक्ष, मंत्री म्हणून राष्ट्रवादीत असताना काम केलेले आहे. संघटनेत केलेल्या कामाची माहिती असल्यामुळे पवारांनी मोठ्या मनाने आमच्या कामाचे कौतुक केले असावे.

पार्थ पवारांबाबत काय म्हणाले?

पार्थ पवारांबाबत तक्रार असण्याचे कोणतेही कारण नाही. अजितदादांच्या मृत्यूनंतर पार्थ आणि जय पवार हे सक्रीय राजकारणात आले आहेत. तरुण नेतृत्व आहे, त्यामुळे त्यांच्याबाबतची तक्रार असण्याचे कारणच काय. दादांसोबत काम केलेले असल्यामुळे योग्य वेळेला आम्ही योग्य मार्गदर्शन त्यांना करत असतो. आम्ही पुढच्या २५ वर्षांचा विचार करून पक्षाची वाटचाल करणार आहोत. झेडपी, ग्रामपंचायती निवडणुका तसेच संघटना वाढीबाबत आम्ही वारंवार बोलत असतो, असेही सुनील तटकरे यांनी नमूद केले.

Sunil Tatkare-Parth Pawar
Vikas Lawande Arrested : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे पोलिसांच्या ताब्यात, 'चोर सोडून संन्याशाला फाशी...' , मनातल्या भावना बोलून दाखवल्या

तो विषय आता संपलाय

राष्ट्रवादीच्या राष्टीय अध्यक्षांचे अधिकार कार्याध्यक्षांना देण्याच्या पत्राबाबत आमची चर्चा झाली आहे. तो विषय आता संपलेला आहे. आम्ही एकमताने आणि एकदिलाने लवकरच महाराष्ट्राचा दौरा काढणार आहोत. त्यातून पक्षाच्या पुनर्बांधणीला वेग देऊ. दादांच्या हयातीत पक्षाच्या बांधणीचा एक ढाचा ठरला होता, आता दादानंतर सगळीच समीकरणं बदलली आहेत. त्या पत्रावर चर्चा झाली आणि त्याबाबतचे समज गैरसमज दूर झालेले आहेत. तो विषय आता संपुष्टात आलेला आहे, असा खुलासाही सुनील तटकरे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com