Anil Parab  Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde Shiv Sena : कोरटकर अन् सोलापूरकरांच्या घरावर कुणी हल्ला केला नाही! अनिल परबांची महायुतीला 'गुगली' (VIDEO)

Maharashtra politics ShivSena Anil Parab Eknath Shinde ShivSena workers Prashant Koratkar Rahul Solapurkar Chhatrapati Shivaji Maharaj : एकनाथ शिंदेंच्या शिवसेना कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमान करणारा प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्या घरावर हल्ला केला नाही, असा सवाल आमदार अनिल परब यांनी केला.

Pradeep Pendhare

Maharashtra politics latest : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक टिप्पणीनंतर कॉमेडियन कुणाल कामरावरून राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघू लागले आहे.

कुणाल कामरा यांचे स्टुडिओची तोडफोड केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष महायुती सरकारविरोधात चांगलाच आक्रमक झाला आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी महायुती सरकारला प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या केलेल्या अपमानाची आठवण करून देत, डिवचलं आहे.

कॉमेडियन कुणाल कामरा यांनी व्यंग्रात्मक टिप्पणीनंतर मुंबईतील त्यांच्या स्टुडिओवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना (Shivsena) कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला. यावरून चांगलेच राजकारण पेटलं आहे. शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे आमदार अनिल परब महायुती सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झाले.

अनिल परब (Anil Parab) म्हणाले, "कोणाची बदनामी केली असेल, तर चुकीचे आहे. कोणाची वैयक्तिक बदनामी करू नये. पण ज्यापद्धतीने कुणाल कामरा यांच्यावरती हल्ला केला, मग प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांनी जो महाराजांचा अपमान केला, त्यांच्या घरावर कुणी हल्ला केला नाही". म्हणजे महाराजांचा अपमान मान्य आहे. आणि माजी मुख्यमंत्र्यांचा अपमान मान्य नाही. असं तर होणार नाही ना, असे अनिल परब यांनी म्हटले.

'कुणाल कामरा यांनी काही चुकीचे केले असेल, तर कायद्याप्रमाणे शिक्षा व्हायलाच पाहिजे. कोरटकर आणि सोलापूरकर यांनी महाराजांचा अपमान केला, त्यांच्याबाबत कोण काही बोलत नाही, त्यांच्या घरावर कोणी गेलं नाही', याची देखील आठवण अनिल परब यांनी करून दिली.

बुलडोझर कारवाईची मागणी केली जात आहे, त्यावर अनिल परब म्हणाले, "सर्वच कारवाया सर्वांवर करा. कुणाल कामरा यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना अटक झाली पाहिजे, तसेच छत्रपतींना अपमान करणाऱ्यांविरोधात देखील कडक कारवाई झाली पाहिजे. कामरावर जशी कारवाई केली, त्यापेक्षा छत्रपतींचा अपमान करणाऱ्या कोरटकर आणि सोलापूरकर यांच्यावर झाली पाहिजे". कोरटकर आणि सोलापूरकर यांना का लपवलं जात आहे. त्यांना का पाठीशी घातलं जात आहे? संपत्ती जप्त का होत नाही? त्यांच्या घरावरती हे शिवसैनिक का जात नाही? असे सवाल अनिल परब यांनी उपस्थित केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT