Kunal Kamra Studio Attack : आधी तोडफोड करणाऱ्या उपमुख्यमंत्री शिंदेंच्या कार्यकर्त्यांवर FIR करा; अंजली दमानियांनी कायद्यानं घेरलं

Anjali Damania Demands FIR Against Shinde’s Suppoters: कुणाल कामरा याच्या स्टुडिओची तोडफोड करणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अंजली दमानिया यांनी केली.
Anjali Damania
Anjali DamaniaSarkarnama
Published on
Updated on

Anjali Damania Latest Statement: शिवसेना नेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कॉमेडियन कुणाल कामरा यांनी केलेली व्यंगात्मक टिप्पणी चांगली झोंबली. शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी यानंतर कुणाल कामरा यांच्याविरुद्ध मुंबईतील एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

पण शिंदेंचे कार्यकर्ते एवढ्यावर थांबले नसून, कुणाल कामरा यांच्या स्टुडिओची तोडफोड केली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यावरून चांगल्याच आक्रमक झाल्या असून, अगोदर कायद्याचा बोला, असे सांगून शिंदेंचे कार्यकर्त्यांविरोधात अगोदर गुन्हा नोंदवा, अशी मागणी केली आहे.

कुणाल कामरा यांचा स्टुडिओची तोडफोड केल्यावरून अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी ट्विट करत, एकनाथ शिंदे यांना सत्तेत असल्याची आठवण करून दिली आहे. कुणाल कामरा जे म्हणाले, ते अवडलं नसेल तर त्यांच्याविरुद्ध कायद्याने लढणं अपेक्षित आहे. पण स्वतः सत्तेत असताना कायदा हातात घेऊन हॉटेलमध्ये शिवीगाळ करणं, तोडफोड करणं याला गुंड प्रवृत्ती म्हणतात, जी आपल्याला दिसली, असे म्हटले आहे.

Anjali Damania
Satyajeet Tambe : राजकारण नाही, तर राजकारणी बिघडलेत; विधान परिषदेतील कामकाजावर आमदार तांबेंची टिप्पणी

कुणाल कामरा यांची टिप्पणी सोडा, आधी FIR हा शिंदे गटाच्या सगळ्यांवर झाला पाहिजे, असे म्हणत अंजली दमानिया यांनी ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्या हॉटेलचे झालेले नुकसान सुद्धा एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) भरून दिले पाहिजे. आपण लोकशाहीत राहतो आणि इथं कायद्याचे राज्य राहील, गुंडगिरीचे नाही, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.

Anjali Damania
Kunal Kamra row : कुणाल कामराच्या स्टुडिओला उद्धव ठाकरेंकडून पैसे! निरुपम यांनी फोटो दाखवत केला गंभीर आरोप

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक टिप्पणीनंतर कॉमेडियन कुणाल कामरावर मुंबईतील एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार मुरजी पटेल यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. तत्पूर्वी, एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील खार येथील हॅबिटॅट कॉमेडी क्लबची तोडफोड केली.

हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेना नेते राहुल कनाल यांच्याविरोधात मुंबईतील खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहाटे चार वाजता पोलिसांनी राहुल कनाल यांना ताब्यात घेतले. भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांतर्गत राहुल कनालसह सुमारे 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com