Uttam Jankar-Eknath Shinde  Sarkarnama
मुंबई

Uttam Jankar : एकनाथ शिंदेंमध्ये कर्णाचं दातृत्व काय दिसलं?; उत्तम जानकरांनी सांगितली 'ती' गोष्ट...

Eknath Shinde News : विरोधी पक्षातील आमदार उत्तम जानकर यांनी शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे केलेले कौतुक चर्चेचा विषय ठरला हेाता. त्यावरून उलटसुटल चर्चा रंगली होती. त्यावर आज खुद्द जानकर यांनी खुलासा केला आहे.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 05 August : माळशिरस तालुक्यात सोमवारी (ता. ०४ ऑगस्ट) होलार समाजाच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोंड भरून कौतुक केले. कर्णानंतर दानशूर एकनाथ शिंदे आहेत, या विधानावर आमदार जानकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

आमदार उत्तम जानकर (Uttam Jankar) म्हणाले, गेली आठ ते नऊ महिन्यांपासून मी विधानसभेत काम करत असताना वेगवेगळ्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्याचा योग आला. माझ्या माळशिरस मतदारसंघातील कन्हेर-इस्लामपूरच्या संगमावर, ज्या ठिकाणी सरसेनापती संताजी घोरपडे यांची हत्या झाली. त्या ठिकाणी संताजी घोरपडे यांचे स्मारक उभे करण्यात यावे, अशी माळशिरस तालुक्यातील जनतेची इच्छा होती.

संताजी घोरपडे यांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मिळावा यासाठी मी उपमुख्यमंत्री शिंदे यांना पत्र दिले होते. ते पत्र वाचल्यानंतर शिंदे यांनी त्या ठिकाणाची माहिती घेतली आणि इतक्या मोठ्या शूरवीराचे स्मारक अवघ्या पाच कोटी रुपयांमध्ये कसं होणार, अशी विचारणा करून त्यांंनी मला स्मारकासाठी दहा कोटी रुपयांच्या मागणीचे पत्र बदलून देण्यात यावे, असे सांगितले. त्यानंतर मी तसे पत्र बदलून दिले आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तातडीने दहा कोटी रुपये मंजूर केले, अशी आठवण जानकर यांनी आज पुन्हा नमूद केली.

ते म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये दातृत्व आहे. नवीन काहीतरी निर्माण करण्याची क्षमता आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्याला जे स्वराज्य मिळवून दिले आहे, ते टिकवण्यासाठी संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांच्याविषयी एकनाथ शिंदे यांच्या मनात जी तळमळ दिसली, तसेच निधी देण्यासाठी हात सैल सोडला. ते मला भावले.

माळशिरस तालुक्यात सोमवारी (ता. 04 ऑगस्ट) होलार समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला हेाता. त्या मेळाव्याला सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि रोहयो मंत्री भरत गोगावले आले होते. त्या कार्यक्रमात मी एकनाथ शिंदे यांचा तो किस्सा सांगितला. त्यांच्यात मला कर्णाचे दातृत्व दिसले, त्यामुळे माझ्या तोंडून ते विधान गेले, असेही जानकर यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, त्याच मेळाव्यात मी मुले आणि मुलींच्या वसतिगृहासाठी सुमारे वीस कोटी रुपयांची मागणी केली. त्याचक्षणी संजय शिरसाट यांनी ते देऊन टाकले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे शिलेदारसुद्धा तेवढेच तत्पर आहेत. मला एकनाथ शिंदे यांच्यामधील दातृत्व दिसले आणि आपसूकच माझ्या तोंडून कर्णानंतर दुसरा दानशूर म्हणजे एकनाथ शिंदे, असे विधान बाहेर पडले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT