
Satara, 05 August : सध्याच्या राजकारणाचा जनतेला किळस वाटायला लागला आहे. निष्ठा नावाची चीज सध्या राहिली नाही. शशिकांत शिंदे तिकडे (उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत) गेले असते, तर मंत्री झाले असते. पण, निष्ठेचे खरे नाव शशिकांत शिंदे आहे, असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मेढा येथे जावळीकरांच्या वतीने शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांचा सत्कार करण्यात आला. त्या सत्कार समारंभात बोलताना रोहित पवार यांनी शशिकांत शिंदे यांच्या निष्ठेबाबत कौतुगोदर काढले. या वेळी माजी आमदार सदाशिव सपकाळ, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र शेलार, तेजस शिंदे, ऋषिकांत शिंदे आदी उपस्थित होते.
रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, जनतेच्या विकासकामांच्या गोंडस नावाखाली भाजपसोबत गेलेले नेते स्वतःचा विकास करायला गेलेले आहेत. पण, शशिकांत शिंदे हे निष्ठेचे खरे नाव आहे. महायुती सरकारने लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांची फसवणक केली आहे. सध्याचे सरकार केवळ पैसे खाण्याचे काम करीत आहे. तोच पैसा पुन्हा निवडणुकीत वापरला जातो. आपल्या सर्वांना या विरोधात मोठा संघर्ष करावा लागणार आहे.
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले, बोंडारवाडी धरणाची अवस्था गेली अनेक वर्षे आहे तशी आहे. माजी आज जावळीचा आमदार असतो, तर बोंडारवाडी धरण झाल्याशिवाय एकही थेंब पाणी खाली जाऊ दिले नसते. मी सुमारे १६ वर्षांपूर्वी जावळी मतदारसंघाचा आमदार होतो. पण, जावळी तालुक्यातील जनता आजही माझ्यावर पहिल्याएवढेच प्रेम करते. हे माझ्या आजच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या गर्दीवरून दिसून येते.
जावळी तालुक्यातील जनतेने माझ्यावर प्रचंड प्रेम केले आहे. या प्रेमातून उतराई होण्याचा माझा निश्चित प्रयत्न राहणार आहे, असे आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, आमदार शशिकांत शिंदे आणि आमदार रोहित पवार यांचे आगमन जावळी तालुक्यात ठिकठिकाणी ग्रामस्थांनी स्वागत करण्यात आले. मेढा शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शिंदे आणि पवार यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.