Uddhav Thackeray and Raj Thackeray and Sharmila Thackeray Sarkarnama
मुंबई

Sharmila Thackeray: ठाकरे बंधू एकत्र येणार का ? शर्मिला ठाकरेंचं सूचक विधान

Uddhav Thackeray and Raj Thackeray News : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का ? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत.

Ganesh Thombare

Mumbai News: राज्याच्या राजकारणात एकत्र नसले तरी एका कौटुंबिक कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एका फ्रेममध्ये दिसून आले. त्यामुळे राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का ? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या. मात्र, यावर आता शर्मिला ठाकरे यांनी भाष्य करत दोन शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये नेहमी राजकीय टोलेबाजी सुरू असते. मात्र, दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर सत्ताधाऱ्यांनी गंभीर आरोप केले होते. त्यावर बोलताना शर्मिला ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंची पाठराखण करत "आदित्य असं काही करेल असं वाटत नाही", अशी प्रतिक्रिया देत त्यांनी आदित्यची पाठराखण केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्याबद्दल शर्मिला ठाकरेंचे आभार मानले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यानंतर एका घरगुती कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एका घरगुती कार्यक्रमात एकत्र दिसून आले होते. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार का ? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. पण यावर आता राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी अगदी मोजक्या शब्दात माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

शर्मिला ठाकरे काय म्हणाल्या ?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे एका घरगुती कार्यक्रमात एकत्र दिसून आले होते, याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, "माझ्या नंणदेच्या मुलाचा साखरपुड्याचा कार्यक्रम होता. त्यामुळे घरातील सर्वजण एकत्र आले होते. माझी नणंद राजकारणात नाही, तसेच राज ठाकरे जसे तिचे भाऊ आहेत, तसं उद्धव ठाकरे देखील भाऊ आहेत", असं त्या म्हणाल्या. तसेच याचवेळी त्यांना ठाकरे बंधू एकत्र येणार का ? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना "बघुया…", असे सूचक विधान त्यांनी केले.

(Edited By - Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT