DMK MP Dayanidhi Maran Statement : यूपी-बिहारचे लोक आमच्याकडे शौचालये.. : द्रमुक खासदाराचे वादग्रस्त विधान!

DMK MP Dayanidhi Maran Controversial Statement : "इंडिया आघाडीतील नेते मौन का बाळगून आहेत? "
DMK MP Dayanidhi Maran Controversial Statement :
DMK MP Dayanidhi Maran Controversial Statement : Sarkarnama
Published on
Updated on

DMK MP Dayanidhi Maran News : तामिळनाडूतील द्रमुकचे खासदार दयानिधी मारन यांनी हिंदी पट्ट्यातील लोकांबाबत अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे.'उत्तर प्रदेश आणि बिहारमधून तामिळनाडूत येणारे हिंदी भाषिक लोक आमच्याकडे शौचालय सफाईचे करतात, अशा प्रकारचं वक्तव्य खासदार मारन यांनी केले. या वादग्रस्त वक्तव्याच्या एक व्हिडिओ क्लिप इंटरनेटवर व्हायरल झाली आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी ही क्लिप ट्विटरवर (X) शेअर करताना इंडिया आघाडीतील यूपी आणि बिहारमधील पक्षांनी या अपमानावर मौन बाळगले आहेत, असा निशाणा साधला. (Latest Marathi News)

DMK MP Dayanidhi Maran Controversial Statement :
Ncp Crisis : आपणही सत्तेत जाऊ शकलो असतो... ; शरद पवारांच्या निष्ठावंत आमदाराचे मोठे विधान

या व्हिडिओ क्लिपमध्ये खासदार मारन हे इंग्रजी आणि हिंदी शिकणाऱ्या लोकांची तुलना करताना ऐकू येतात. ते म्हणतात की, 'इंग्रज लोक आयटी कंपन्यांमध्ये जातात, तर हिंदी लोक छोट्या-मोठ्या नोकऱ्या करतात.' यावर भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी आपल्या पोस्टमध्ये इंडिया आघडीवर जात, भाषा आणि धर्माच्या आधारावर देशातील लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आणि द्रमुक खासदाराच्या या वादग्रस्त विधानाबाबत विरोधकांच्या आघाडीवर 'निष्क्रियता'वर टीका केली.

सपा-जेडीयू-आरजेडी-काँग्रेसच्या मौनावर भाजपचा सवाल -

दयानिधी मारन यांनी वापरलेली भाषा दुर्दैवी असल्याचे भाजप नेत्याने म्हटले आहे. मारन यांच्या वक्तव्यावर त्यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारमधील इंडिया आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. यावर त्यांनी मौन का बाळगले आहे, असा सवाल भाजपने केला आहे. शहजाद पूनावाला म्हटले, 'नितीश कुमार, तेजस्वी यादव, लालू यादव, काँग्रेस, सपा, अखिलेश यादव यावर कधी भूमिका घेणार आहेत का? संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हिंदी भाषक राज्यांविरुद्ध वक्तव्य करून वाद निर्माण करणाऱ्या डिएमके खासदार सेंथिलकुमार यांच्यावर इंडिया ब्लॉकने कोणतीही कारवाई केली नाही. त्यांनी हिंदी भाषिक राज्यांना 'गोमूत्र' राज्य म्हटले होते.

DMK MP Dayanidhi Maran Controversial Statement :
Sakshi Malik : भाजप खासदाराला भिडली, पण अखेर कुस्ती सोडावी लागली

सनातन धर्माची 'डेंग्यू-मलेरिया'शी तुलना -

पूनावाला यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा पुत्र उदयनिधी स्टॅलिन आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केलेल्या यापूर्वीच्या वक्तव्यांचाही आठवण करुन दिली. अलीकडेच तामिळनाडूचे मंत्री आणि द्रमुकचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना 'डेंग्यू' आणि 'मलेरिया'शी केली होती आणि सनातनला केवळ विरोध करून चालणार नाही, तर त्याचे समूळ उच्चाटन केले पाहिजे, असे म्हटले होते.

तेलंगणाचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यामध्ये त्यांनी त्यांचे विरोधक आणि माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर भाष्य करताना ते म्हणाले होते, 'केसीआर यांचा डीएनए तेलंगणाचा नसून बिहारचा आहे."

(Edited by - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com