Aaditya Thackeray-Santosh Kharat
Aaditya Thackeray-Santosh Kharat Sarkarnama
मुंबई

Shinde Group News : आदित्य ठाकरेंच्या गडाला सुरुंग; वरळीतून शिवसेनेचा पहिला नगरसेवक शिंदे गटात सामील

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना वरळी (Worali) विधानसभा मतदारसंघातच मोठा धक्का बसला आहे. आदित्य यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीतील शिवसेनेचा (Shivsena) पहिला नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गोटात सहभागी झाला आहे. आगामी मुंबई (Mumbai) महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला मुंबईत मोठा झटका बसला आहे. (Worali corporator Santosh Kharat joins Shinde group)

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी नगरसेवक संतोष खरात यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. वरळी हा युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. याच मतदारसंघातून संतोष खरात हे निवडून आलेले आहे. आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातला पहिला नगरसेवक शिंदेंच्या गटात सामील झाला आहे.

संतोष खरात हे वरळीतील वॅार्ड क्रमांक १९५ मधील नगरसेवक विद्यमान नगरसेवक होते. त्यांची मदत संपली असूनही कोविडमुळे महापालिका निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अद्याप मुंबई महापालिकेची निवडणूक होऊ शकलेली नाही. त्यातच खंदे कार्यकर्ते साथ सोडत असल्याने ठाकरे गटाची मुंबई अडचणी वाढत आहेत.

समाधान सरवणकर, शीतल म्हात्रे यांच्या पाठोपाठ आता संतोष खरातही बाळासाहेबांच्या शिवसेनेत सहभागी झाले आहेत. त्यातही आदित्य ठाकरे यांच्याच मतदारसंघातील माजी नगरसेवक पक्ष सोडून गेल्यानं चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे यांना निवडणूक सोपी जावी; म्हणून विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीचे तत्कालीन नेते सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला हेाता.

दुसरीकडे भारतीय जनता पक्षाकडून मुंबई पालिकेची जोरदार तयारी सुरू करण्यात आलेली आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी या आठवड्यातच पुन्हा मुंबईत येत आहेत. यापूर्वी त्यांनी मुंबईत येऊन मुंबई महापालिकेच्या प्रचाराची पायाभरणी सुरू केल्याचे मानले जात आहे. त्यातच भाजप आणि शिंदे गटाकडून शिवसेनेला लक्ष्य केले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT