BJP appoints Devendra Fadnavis's trusted aide, Praveen Datke, as the election in-charge for all upcoming local body polls in Nagpur district. Sarkarnama
नागपूर

Nagpur BJP : CM फडणवीसांनी विश्वासू नेत्याकडे दिली 'नागपूरची' जबाबदारी : लोकसभेला हिरमोड झालेला नेताही सोबतीला!

Nagpur BJP : नागपूर जिल्ह्यात भाजपने प्रवीण दटके यांच्यावर संपूर्ण जिल्ह्यात होणाऱ्या नगरपालिका ते महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी सोपविली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Nagpur BJP : नागपूर जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी भाजपने प्रवीण दटके यांच्यावर सोपविली आहे. जिल्ह्यात अनेक अनुभवी नेते असताना प्रथमच मध्य नागपूरमधून निवडून आलेले दटके यांना एकप्रकारे भाजपने पदोन्नतीची दिली आहे. ते नागपूर शहराचे महापौरसुद्धा होते. त्यांच्या मदतीसाठी ग्रामीण भागातून निवडणूक प्रमुख म्हणून भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार आणि माजी जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांना सोबत देण्यात आले आहे.

प्रवीण दटके हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू समजले जातात. चार वर्ष ते विधान परिषदेवर होते. विधानसभेच्या निवडणूक त्यांनी मध्य नागपूरमधून लढवली. मुस्लिम आणि हलबा बहुल असलेल्या या मतदारसंघातून दटके हे निवडून आले आहेत. याच मतदारसंघातील विजयाची हॅटट्रिक साधलेल्या आमदार विकास कुंभारे यांना भाजपने यावेळी थांबवले होते. त्यामुळे हलबा समाज मोठ्या प्रमाणात नाराज होता. जातीय समिकरण बघता दटके यांच्याविषयी सर्वांनाच धाकधकू वाटत होती.

नगरपालिका आणि नगर पंचायतची निवडणूक सध्या जाहीर झाली आहे. त्यानंतर जिल्हा परिषद आणि महापालिकेची निवडणूक होणार आहे. येणाऱ्या 3 महिन्यात स्थानिकच्या सर्वच निवडणुका होणार आहेत. याकरिता भाजपने प्रवीण दटके यांची संपूर्ण जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.

ग्रामीणमध्ये प्रवीण दटके यांना दोन जुन्या व ज्येष्ठ नेत्यांची साथ लाभणार आहे. भाजपचे माजी जिल्हा प्रमुख डॉ. राजीव पोतदार आणि दुसरे माजी जिल्हा प्रमुख अरविंद गजभिय यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अरविंद गजभिये रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक होते. मात्र ही जागा शिंदे सेनेने सोडण्यास नकार दिला होता. शेवटी काँग्रेसचे माजी आमदार राजू पारवे यांना आयात करून महायुतीचे उमेदवार करण्यात आले होते. मात्र भाजपचा हा प्रयोग फसला.

ही लोकसभा सलग दोनवेळा शिवसेनेच्या कृपाल तुमाने यांनी जिंकून दिली होती. या लोकसभेच्या निवडणुकीत आयात धोरणामुळे भाजपला मोठा फटका बसला होता. भाजप आमदारांच्या सर्वच विधानसभा मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य घटले होते. यात भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान महसूल व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याही कामठी मतदारसंगाचा समावेश होता. ही कसर भाजपच्या सर्व आमदारांनी विधानसभेत भरून काढली.

नागपूर ग्रामीणमध्ये भाजपला अद्यापही हमखास निवडून येण्याची गॅरंटी नाही. ग्रामीणधील लोकांचा कल काँग्रेसकडे आहे. त्यातही शेतकऱ्यांची मोठी नाराजी सरकारवर आहे. आमदारांना भविष्याती आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी स्थानिक निवडणुकीत मोठी मशागत करावी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT