Nagpur News : नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजप सेना युतीचे एक पाऊल पुढे पडले आहे. भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपसात बैठक घेऊन जागा वाटपावर चर्चा केली. यावेळी शिवसेनेच्यावतीने 50 जागेची मागणी करण्यात आली. यावर वरिष्ठांसोबत चर्चा करून भाजप आपला निर्णय कळवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने 15 टक्क्यांचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र यावर भाजपच्यावतीने अद्याप कुठलाच प्रतिसाद देण्यात आला नाही. यावरून राष्ट्रवादी सोडून नागपूरमध्ये युती होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शिवसेनेच्यावतीने आमदार कृपाल तुमाने, पूर्व विदर्भाचे संघटक किरण पांडव आणि जिल्हा प्रमुख सूरज गोजे तर भाजपच्यावतीने माजी आमदार अनिल सोले, आमदार प्रवीण दटके आणि माजी आमदार गिरीश व्यास या बैठकीला उपस्थित होते. नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने युती करणार असल्याचे जाहीर कले होते. मात्र शेवटपर्यंत वाटाघाटी केल्या नाहीत.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) एकत्रित बैठक घेतली होती. भाजपच्या नेत्यांना बैठक घेऊन जागा फायनल करण्यासाठी निरोप धाडण्यात आला होता. मात्र त्याला भाजपच्यावतीने प्रतिसाद देण्यात आला नव्हता. शेवटी सर्वच पक्ष स्वबळावर लढले. एकमेकांचे उमेदवार व कार्यकर्ते पळवले. नाराजांना व बंडखोरांना आपल्या पक्षात खेचण्यात आले होते. त्यावरून युतीमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता. तसेच मोठा गोंधळही निर्माण झाला होता.
महापालिकेच्या निवडणुकीत हा प्रकार टाळण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे. मागील नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे (BJP) 108 तर शिवसेनेचे फक्त दोन नगरसेवक निवडून आले होते. आठ ते दहा उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती.
त्यावेळी सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते. मतविभाजनाचा फटका शिवसेनेला (Shivsena) बसला होता. दुसऱ्या क्रमांकाची मते घेणारे उमेदवार आता शिंदे आणि उद्धव ठाकरे सेनेत विभागले आहेत. याशिवाय भाजपकडे उमेदवारांची तुफान गर्दी आहे. 151 जागाही त्यांना अपुऱ्या पडू लागल्या आहेत, अशी परिस्थिती असताना शिवसेनेचे 50 जागांची मागणी केली आहे. आता भाजप किती जागेवर शिवसेनेची बोळवण करते याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.