Devendra Fadanvis, Dada Bhuse sarkarnama
नाशिक

Nashik BJP News : नागपूरला सवलती आणि दत्तक नाशिककडून होतेय वसुली!

Nashik नाशिककरांवर चार ते अकरा पट एवढी घरपट्टीची वाढीव वसुली नागरिकांकडून केली जात आहे. त्यामुळे शहराचा विकास खुंटला, असा दावा तानाजी जायभावे यांनी केला आहे.

Sampat Devgire

Taanaji Jaybhave News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहर दत्तक घेतले आहे. मात्र, या दत्तक शहरावर भाजपच्या सत्ता काळात प्रचंड अन्याय होत आहे. घरपट्टीची पठानी वसुली होत आहे. त्यावर शहरातील भाजपच्या आमदारांनी आता यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी माजी नगरसेवक तानाजी जायभावे यांनी केली आहे.

यासंदर्भात माजी उपमहापौर गुरमीतसिंग बग्गा आणि माकपचे नेते तानाजी जायभावे यांनी राज्य शासनाकडे तसेच उच्च न्यायालयात याचिका दाखल करून पाठपुरावा केला आहे. महापालिकेत भाजप सत्तेत असताना आणि तुकाराम मुंडे आयुक्त असताना त्यांनी नियमबाह्य कामकाज केले. महासभेने घरपट्टी रद्द करण्याचा ठराव केला. त्यावर कार्यवाही न करता तो तसाच दप्तरी दाखल करून ठेवला.

त्यामुळे नाशिककरांवर चार ते अकरा पट एवढा घरपट्टीची वाढीव वसुली नागरिकांकडून केली जात आहे. त्यामुळे शहराचा विकास खुंटला, असा दावा तानाजी जायभावे (Tanaji Jaybhave) यांनी केला आहे. महापालिकेने २०१८ मध्ये शहरात घरपट्टी करात चार पट, तर औद्योगिकरात ११ पट आणि व्यावसायिक घरपट्टीत तिप्पट वाढ केली. त्या विरोधात 'मी नाशिककर' या नावाने मोठे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर विशेष महासभा घेऊन ही करवाढ रद्द करण्याचा ठराव करण्यात आला.

मात्र, घरपट्टी वाढ विखंडित करण्यासाठी त्या ठरावाची कार्यवाही केली नाही. तो ठराव दप्तरी दाखल केला. आयुक्त मुंडे यांनी नियमबाह्य पद्धतीने नागरिकांवर करवाढ केली. ही करवाढ एवढी जाचक आणि मोठी होती की अनेक मालमत्ता पडून आहेत. शहराचा विकास खुंटला आहे. मात्र, याबाबत शहरातील भाजपचे आमदार शासनाकडे पाठपुरावा करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी काही तरी करावे. जाचक आणि अन्यायकारक करवाढीवर तोडगा काढावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडून आता या विषयावर पाठपुरावा सुरू झाला आहे. संबंधित ठराविक खंडित करण्यात यावा, असे पत्र नुकतेच शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. यापूर्वीही दोन वेळा एकनाथ शिंदे नगर विकासमंत्री असताना त्यांना असे निवेदन देण्यात आले होते. त्यांनी करवाढ रद्द करण्यास होकारदेखील दिला होता. याबाबत खासदार हेमंत गोडसे यांनीदेखील प्रयत्न करून मुख्यमंत्र्यांचा मिळत दोन वेळा बैठक आयोजित केली होती, असेही जायभावे यांनी सांगितले.

अद्याप महापालिकेतील घरपट्टीची करवाड रद्द करण्याबाबत कार्यवाही झालेली नाही. प्रशासनातील काही अधिकारी झारीतील शुक्राचार्य बनले आहेत. ते ही करवाढ रद्द करण्यास अडथळे आणत असल्याचे सांगितले जाते. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहर दत्तक घेतले असल्याची घोषणा केली होती. घोषणा केली तरी नाशिकसाठी ठोस काहीही झालेले नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नागपूर शहराला अनेक सवलती दिल्या जात आहेत. मात्र, नाशिक शहरात प्रचंड करवाढ व त्यातून पठाणी वसुली महापालिकेमार्फत होत आहे. श्रेय कोणत्याही पक्षांनी घ्यावे. मात्र, नाशिककरांवरील हा अन्याय दूर करावा. भारतीय जनता पक्षाचे शहरात तीन आमदार आहे. यातील आमदारांनी या विषयावरील मौन सोडावे आणि ठोस कृती करावी, अन्यथा नाशिककरांच्या संतापाला सामोरे जावे लागेल. असा इशारा जायभावे यांनी दिला आहे.

Edited By : Umesh Bambare

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT