Chhagan Bhujbal, Devendra Fadanvis, Ajit Pawar sarkarnama
नाशिक

NCP Ajit Pawar Group: भाजपला जोर का झटका; भुजबळ नसतील तर अरींगळेंना द्या उमेदवारी!

Chhagan Bhujbal अजित पवार गटाने भुजबळांच्या उमेदवारीवरून शिवसेना आणि भाजपला गाठले खिंडीत

Sampat Devgire

Nashik constituency 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीतील गोंधळ सुरूच आहे. त्यात आज नवी भर पडली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने कणखर भूमिका घेत भाजप किंवा शिंदे गटाचा उमेदवार स्वीकारण्यास नकार दिला आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत आहे. गेल्या आठवडाभरापासून त्यांच्या नावाची चर्चा असून, याबाबतची घोषणा केव्हाही अपेक्षित आहे. राज्यातील प्रमुख ओबीसी नेते म्हणून परिचित असलेल्या भुजबळ यांना भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे शिंदे गटातील काही नेत्यांनी विरोध केला आहे. त्याचे पडसाद उमटले आहेत.

यासंदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार गटाचे नेते मनोहर कोरडे यांनी पत्रकार परिषद घेऊन भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवारांची इच्छुक म्हणून होणारी चर्चा थांबवावी, अशी मागणी केली. नाशिक मतदारसंघावर सर्वप्रथम अजित पवार गटाने दावा केला होता. या वेळी पक्षाचे नेते निवृत्ती अरींगळे Nivrutti Aringale यांनी उमेदवारीची मागणी केली होती. या संदर्भात महायुतीच्या नेत्यांचीदेखील चर्चा झाली होती.

पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नाशिक मतदारसंघाबाबत अरींगळे यांच्या समर्थकांना आश्वासित केले होते. मात्र, आता महायुतीतील घटक पक्षांमध्ये गुरू होळीच्या राजकारणात भुजबळ यांना पर्याय म्हणून अन्य नावांची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मागणीने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाची चांगलीच कोंडी होणार आहे.

या गटाकडून भाजपचे आमदार राहुल ढिकले आणि खासदार हेमंत गोडसे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आदी नावांवर भुजबळ यांना पर्याय म्हणून चर्चा आहे. त्याला कोरडे यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. भुजबळ हे एक प्रभावी नेते आहेत. त्यांची राज्यभर ख्याती आहे. त्यांची उमेदवारी झाली पाहिजे तसे होत नसल्यास त्याला पर्याय केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अरींगळे यांचाच असेल. अन्य पक्षांचे किंवा अन्य उमेदवार चालणार नाही. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनादेखील अवगत करण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाशिक मतदारसंघाच्या उमेदवाराबाबत महायुतीतील घटक पक्षांमध्ये रोज नवा गोंधळ आणि नव्या उमेदवारांची चर्चा होत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येदेखील नकारात्मक संदेश जात आहे. महाविकास आघाडीने शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ती वाजे यांनी प्रचारदेखील सुरू केला आहे. या स्थितीत महायुतीतील जागावाटप आणि उमेदवार गोंधळ केव्हा थांबणार हा चर्चेचा विषय आहे.

Edited By : Umesh Bambare

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT