Chhagan Bhujbal News : छगन भुजबळांच्या उमेदवारीची घोषणा का लांबतेय?

Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिकमधून ठाकरे गटानं राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली आहे. तर, महायुतीकडून भुजबळांना संधी दिल्यास हेमंत गोडसे काय करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : नाशिक लोकसभा मतदारसंघात ( Nashik Lok Sabha Election 2024 ) उमेदवार कोण? आणि जागा कोणाला? याबाबत महायुतीमध्ये प्रचंड वाद आहेत. या वादावर तोडगा काढण्यात वरिष्ठ नेत्यांना यश आलेले नाही. या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांच्या उमेदवारीची घोषणा सातत्याने लांबत आहे.

नाशिक मतदारसंघातून ( Nashik Lok Sabha Election 2024 ) राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांची उमेदवारी चर्चेत आहे. भारतीय जनता पक्षाला ओबीसी कार्ड म्हणून भुजबळ यांना उमेदवारी देण्याचा विचार आहे. याबाबत पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांकडून सूचना आल्या आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर राज्याच्या नेत्यांना उमेदवार कोण? हा प्रश्न सोडविण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. महायुतीच्या घटक पक्षांमध्ये नाशिकच्या जागेवरून सुरू असलेला तणाव अद्यापही कायम आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीकडून विविध सर्वेचा आधार घेत शिवसेनेच्या शिंदे गटाला कोंडीत पकडण्यात आले आहे. त्यांच्या तीन विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे ( Hemant Godse ) यांना देखील उमेदवारीसाठी भारतीय जनता पक्षाने विरोध केला आहे. नाशिक मतदार संघात शिंदे गटाचा विद्यमान खासदार आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने देखील या जागेवर दावा सांगितला आहे. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने नाशिकचा मतदार संघ मिळावा म्हणून शिंदे गटा विरोधात अक्षरशः रान उठविले आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय निर्माण करण्याचे मोठे आव्हान आहे. त्यामुळेच नाव निश्चित असूनही छगन भुजबळ यांच्या उमेदवारीची घोषणा सातत्याने लांबत आहे.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal News: छगन भुजबळांच्या उमेदवारीची संघाकडून होतेय चाचपणी?

हा मतदारसंघ महाविकास आघाडीचा घटक पक्ष शिवसेना ठाकरे गटाला सोडण्यात आलेला आहे. ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे ( Rajabhau Waje ) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शांतिगिरी महाराज यांनी देखील अपक्ष लढण्याचं जाहीर केलं आहे. या दोघांचाही प्रचार सुरू झालेला आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे अद्यापही उमेदवारीसाठी उत्सुक आहेत. त्यांना उमेदवारी न मिळाल्यास ते काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे भुजबळ यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदार संघातील राजकीय चित्र स्पष्ट होईल.


( Edited By : Akshay Sabale )

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal News: नाशिकमधून छगन भुजबळच का? हे आहे कारण...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com