Girish Mahajan News: कुंभमेळ्यासाठी त्रंबक रोडचे वादग्रस्त रुंदीकरणाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. यासंदर्भात गेले बारा दिवस आंदोलन सुरू आहे. या शेतकऱ्यांची आज कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेतली. त्रंबक रोड 100 मीटर रुंद व मोकळा करण्याचा आदेश शासनाने दिला होता. एनएमआरडीएने या भागातील शेतकऱ्यांची घरे आणि बांधकामे पाडली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला.
या संदर्भात कैलास खांडबहाले व त्यांच्या सहकाऱ्यांनी साखळी उपोषण केले होते. याबाबत शेतकरी आणि महिलांनी आंदोलन केले. त्यामुळे आमदार हिरामण खोसकर आणि स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून मंत्री गिरीश महाजन यांनी दोन दिवसांपूर्वी या भागाला भेट दिली होती. प्रत्यक्ष परिस्थिती अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करून निर्णय घेण्याच्या आश्वासन दिले होते. आज कुंभमेळा मंत्री महाजन यांनी त्र्यंबकेश्वर परिसरात भेट दिली.
यावेळी आमदार हिरामण खोचकर आणि आमदार सरोज अहिरे यांसह स्थानिक शेतकरी उपस्थित होते. ॲड तानाजी जायभावे आणि आमदारांनी शहराची साडेबावीस मीटर हीच मर्यादा कायम ठेवावी अशी मागणी केली. जागा उपयोगात नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान करू नये अशी विनंती केली. त्रंबक रोड वरती ठिकाणी कुंभमेळा मंत्री महाजन यांनी प्रत्यक्ष टेप घेऊन अधिकाऱ्यांना मोजणी करायला लावली. 100 मीटर जागेची आवश्यकता नसल्याचे त्यांचेही मत बनले. मात्र त्यांनी याबाबत कोणताही निर्णय दिला नाही.
किती जागा सोडावी हा धोरणात्मक निर्णय असल्याने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क केला. मात्र मुख्यमंत्री अन्य कार्यक्रमात असल्याने एक तासाने चर्चा करण्याच्या सूचना देण्यात आले. यासंदर्भात शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतल्या आहेत. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून उद्या निर्णय करू असे मंत्री महाजन यांनी सांगितले. गेले काही दिवस त्र्यंबकेश्वरच्या जागांबाबत कोणताही पंचनामा न करताच कारवाई झाल्याने नाराजी होती. आता मंत्री महाजन यांनी पंचनामे करून भरपाई देण्याचे निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.