Devendra Fadanvis, Ajit Pawar and Eknath Shinde
Devendra Fadanvis, Ajit Pawar and Eknath Shinde Sarkarnama
नाशिक

Ajit Pawar On Sambhajinagar Riot: मुद्दामहून दंगली घडवल्या जात आहेत का? अजितदादांचा शिंदे-फडणवीसांना सवाल

सरकारनामा ब्यूरो

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर येथे दोन गटात राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. काल बुधवारी (मध्यरात्री) हा प्रकार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

शहराच्या नामांतराच्या महिन्यानंतर ही घटना घडत आहे. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता (Dr.Nikhil Gupta) यांनी सांगितले

या हिंसाचारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. या दंगलीला त्यांनी राज्य सरकारला जबाबदार धरले आहे. ते आज सकाळी नाशिकमध्ये बोलत होते.

छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात (Kiradpura) दोन गटात वाद झाला आहे. या वादानंतर दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली. बुधवारी मध्यरात्री सुमारे तीन तास येथे राडा सुरु होता. यात जमावाने पोलिसांच्या वाहनावर, नागरिकांच्या घरांवर दगडफेक केली.

दगडफेकीत पोलिसांच्या १३ गाड्याचे नुकसान झाले आहे. या घटनेत पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक जण जखमी झाला आहे. यावेळी झालेल्या भांडणात समाजकंठकांनी पोलिसांच्या नऊ गाड्या जाळल्या. तर राममंदिरांच्या बाहेरची कमान जाळली.

अजित पवार म्हणाले, "मुद्दामहून अशा प्रकारच्या दंगली घडवून आणल्या जात आहेत का, उद्याचे काही वेगळा विचार डोळ्यांसमोर ठेवून दोन धर्मामध्ये कसे अंतर वाढेल असा काही प्रयत्न चालला आहे का. हे सगळे पोलिस यंत्रणेने शोधले पाहिजे. आणि ते सगळे थांबवले पाहिजे," या दंगली मागचा मास्टरमाइंड शोधून काढा, असे आवाहनही त्यांनी पोलिसांना केले.

"प्रत्येक भागातली कायदा - सुव्यवस्था चांगली ठेवणे हे पोलिस यंत्रणेचे काम असते. ही व्यवस्था ठेवताना कुठल्याही राजकीय दबावाखाली यंत्रणेने काम करता कामा नये. काल जो प्रकार झाला. त्यानंतर बंदोबस्त वाढवलेला आहे.काय वस्तूस्थिती घडली. या मागचा मास्टरमाइंड कोण आहे, हे सरकारने शोधून काढले पाहिजे," असे अजित पवार म्हणाले.

किरकोळ कारणावरुन दोन गटात वाद निर्माण झाला त्याचे पर्यावसान भांडणात झाले, दोन गट एकमेकांना भिडल्याने पोलिसांनी हवेत गोळीबार करावा लागला. अश्रूधुराचा वापर पोलिसांनी केला. सध्या येथील पोलिसांच्या नियंत्रणात आहे. येथे तणावपूर्ण शांतता आहे.

राम मंदिरात तयारीसाठी जमलेल्या युवकांच्या एका गटाचा दुसऱ्या गटाशी वाद झाल्याने ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

रात्री बारा वाजण्याच्या सुमारात एस गट राम मंदिराच्या दिशेन जात असताना दुसऱ्या गटाशी त्यांचा वाद झाला. दोन्हा गटांकडून घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर दगडफेकीचा प्रकार घडला. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचे फडणवीस यांनी माध्यमांना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT