Sharad Pawar And Ajit Pawar Sarkarnama
नाशिक

Sharad Pawar: अजितदादांचे 7 आमदार असलेल्या जिल्ह्यात शरद पवार उतरणार मैदानात! 14-15 तारखेला ढवळून काढणार राजकारण

शरद पवार हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग इथून फुंकणार आहेत.

सरकारनामा ब्युरो

नाशिक : शेतकऱ्यांचे विविध प्रश्‍न व मागण्यांसाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथे सोमवारी (ता. १५) ‘लढा बळीराजाचा शेतकरी आक्रोश मोर्चा’ काढला जाणार आहे. शेतकरी कर्जमाफी, कांदा दराचा प्रश्‍न, कापसावरील आयत शुल्क हटविण्याचा निर्णय, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी लूट व फसवणूक, शेती मालाला हमीभाव व भावांतर योजना, कृषी निविष्ठा जीएसटीमुक्त झाल्या पाहिजेत, नैसर्गिक आपत्तीचे तत्काळ पंचनामे व वाढीव दराने मदत अशा विविध मुद्द्यांवर आवाज उठविण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर मोर्चाचे नेतृत्व स्वत: शरद पवार करणार आहेत. मोर्चासाठी राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री जयंत पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, यांसह पक्षाचे राज्यातील सर्व खासदार, आमदार, प्रदेश कार्यकारिणीतील पदाधिकारी, जिल्हास्तरावरील प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

सकाळी ११ वाजता शहरातील गोल क्लब येथून मोर्चाची सुरुवात होणार आहे. पुढे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येईल. त्यानंतर मोर्चाची सांगता होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे यांनी दिली.

शेतीमालाच्या उत्पादन खर्चावर दीड पट हमीभाव, दुधाचे दर व अनुदान, ओला दुष्काळ जाहीर करून भाजीपाला उत्पादकांसाठी विशेष पॅकेज, बोगस खते बियाणे संबंधित कारवाई व लिंकिंग, भात, नागली व वरई या पिकांना योग्य बाजारभाव यासह निफाड कारखान्याचा मुद्दा या मोर्चाच्या निमित्ताने उपस्थित करण्यात येणार आहे. या मोर्चाच्या नियोजनाच्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी (ता. १२) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये नियोजन आढावा बैठक घेतली.

उद्या पक्षाचे शिबिर

शरद पवार हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग नाशिकमधून फुंकणार आहेत. त्यासाठी पक्षाचे शिबिर रविवारी (ता. १४) आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT