
Mumbai News: राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता नवनवीन राजकीय समीकरणं जुळून येण्याची शक्यता आहे. यातच विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाललेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे या दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी आता त्यांच्यातलं 20 वर्षांचं राजकीय वैर मिटवून घेत मुंबई महापालिकेसाठी युतीचे संकेत दिले आहेत.पण ठाकरे बंधूंच्या या युतीचा सर्वाधिक फटका कोणाला बसणार याविषयी मोठी अपडेट समोर आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यात भेटीगाठी वाढल्या आहेत. मागच्या पंधरा दिवसांत या उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर दोनवेळा जाणं झालं होतं. यानंतर युतीवर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंची युती टेन्शन वाढवणारी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही नेत्यांच्या एकत्र येण्याचा सर्वाधिक फटका हा काँग्रेसला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे 2019 नंतर राज्यात उदयाला आलेल्या महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत होती.
यात गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मविआमधील काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेना या दोन्ही पक्षांतील मतांचं विभाजन टाळण्यात यशस्वी ठरल्यानं दोन्ही पक्षांना मुंबईत मोठा फायदा झाल्याचे पाहायला मिळाले होते.
महत्त्वाची बाब म्हणजे शिवसेनेतील एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील मविआ सरकारला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. पण तरीही यानंतर लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि ठाकरेंना आघाडीचा चांगलाच फायदा झालेला दिसून आला होता. पण जर स्थानिक निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीची साथ सोडण्याची शक्यता आहे.
पण जर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) महाविकास आघाडीत आणलं तर काँग्रेसला याचा मोठा फटका बसू शकतो. कारण राज ठाकरे यांची गेल्या काही दिवसांपासून कट्टर हिंदुत्त्वादी भूमिका स्वीकारली आहे. तसेच मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दाही चांगलाच पेटवला होता. हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी आक्रमक भूमिकाही राज ठाकरेंनी घेतली आहे.
तर दुसरीकडे काँग्रेसनं नेहमीच धर्मनिरपेक्षतेचं भूमिका घेत हिंदुत्वाच्या मुद्द्याला बगल दिली आहे. त्याचमुळे राज ठाकरेंना काँग्रेससोबत आणि काँग्रेसला राज ठाकरेंसोबत महाविकास आघाडीमध्ये जुळवून घेणं फार अवघड जाणार आहे.
राज ठाकरेंनी कायमच मराठीचा मुद्दा मांडताना परप्रांतियांविरोधात आंदोलनं,मोर्चे,सभा,मेळावे यांच्यामधून आक्रमक आणि तितकीच कठोर भूमिका घेतली होती.मुस्लिम समुदायाविरोधातली राज ठाकरेंनी केलेली विधानं काँग्रेसच्या एकगठ्ठा मतदानावर गदा आणू शकतात.
तसेच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर एकनाथ शिंदे यांनाही तेवढाच धक्का बसण्याची शक्यता आहे. बाळासाहेब ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेंच्या ठामपणे पाठीशी राहिल्यानंतर सोबतीला जर राज ठाकरे आले तर इतकी वर्षे होत असलेली मतविभागणी टाळली जाणार आहे. त्याचाच फायदा या निवडणुकीत शिंदे यांना बसू शकतो.
भाजपलाही उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंच्या युतीचा मोठा फटका बसू शकतो. ठाकरे बंधू जर एकत्र आले, तर त्याचा मोठा फटका हा भाजपला मुंबई महापालिका निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. कारण मुंबईत शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांची इतकी वर्षे युती राहिल्यामुळे आणि दोन्ही पक्षांची विचारधारा मिळतीजुळती असल्यानं मतदारही एकच राहिला आहे.
राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर मनसेमुळे विभाजन होत असलेली मतं आता भाजपसाठी नेहमीच फायदेशीर ठरत आली होती. पण आता ठाकरे बंधूंच्या युती अस्तित्वात आली, तर ठाकरेंच्या शिवसेनेला फायदा भाजपला तोटा होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.