Aaditya Thackeray News : मुंबईसह महाराष्ट्रातील विकासकामे रखडली आहेत. उद्घाटनाची वेळ नाही म्हणून लोकांना त्रस्त ठेवण्यासाठी सरकार असे करत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या 40 जोकरांची सर्कस सुरू आहे. 'हे जोकर फिरतायत ते काय काय करतायत ते आपण पाहताय', अशा शब्दात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांचा समाचार घेतला.
तर देशात भाजपकडून जो कारभार सुरू आहे, तो चालणार आहे का ? असा सवाल त्यांनी व्यक्त केला. ते मुंबईत (Mumbai) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मुंबईत एमपीएचएलचे उद्घाटन करायचे आहे का हे माहीत नाही. तसेच कोस्टल रोड, वरळी-शिवडी ही कामे रखडली आहेत. दिघा स्टेशन आठ महिने तयार होवून पेंडिंग आहे. उरण लाईन, डोंबिवली-माणकवली कनेक्टर अशी कितीतरी कामे उद्घाटनाची वेळ नाही म्हणून अडकली आहेत.
लोकांना त्रस्त ठेवण्यासाठी सरकार असे करत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केला आहे. 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न करु असे आदित्य ठाकरे यांच्याकडून सांगणण्यात आले होते. यावर ते म्हणाले आतापर्यंत या सरकारने महाराष्ट्रात सरकारने दिलेली आश्वासने आहेत त्यातील एकतरी पूर्ण केले आहे का ? आता मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीमध्ये अधिवेशन लावू, असे सांगण्यात आले आहे.
पण तोवर सरकार टिकणार आहे का ? का त्यांनी सरकार टिकवणासाठी सेटिंग केली आहे, अशी शंका ठाकरे यांनी व्यक्त केली. रायगड जिल्ह्यात महाडमध्ये झालेल्या प्रकाराबाबत ठाकरे म्हणाले, आमदार भरत गोगावले यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी जे वक्तव्य केले ते निर्लज्ज, नीच आणि घाणेरडे आहे. पण त्यातून त्यांच्या मनातील आणि हृदयातील बाहेर येत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी असे विचार करणे आणि कोणाला सांगणे हे निर्लज्जपणाचे लक्षण आहे.
भाजपचा कारभार असाच चालणार?
पोलिस दलातील आयपीएस तसेच प्रशासकीय विभागातील आयएएस स्तरावरच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये या गद्दारांकडून पैसे मागितले जात आहेत.
याच्या व्हिडिओ क्लिप वारंवार व्हायरल झालेल्या आहे. एका ठिकाणी तर अपहरण केल्याची घटना घडली आहे. ज्यांनी पोलिस स्टेशन तसेच गणपती मिरवणुकीत गोळीबार केले त्या घटना प्रसार माध्यमांवर आल्या आहेत. त्याच व्यक्तिला सिद्धिविनायक ट्रस्टचा अध्यक्ष करण्यात आले आहे. हा असा सगळा कारभार देशात भाजपकडून (BJP) सुरू आहे, तो चालणार आहे का ? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला.
तर आपण गुड 'गव्हर्नन्स डे' साजरा करतो, याआधी आपण विचार केला पाहिजे की, गुड गव्हर्नन्स एका बाजूला पण महाराष्ट्राच्या सत्तेत गव्हर्नन्स विसरलेले लोक बसले आहेत आणि हा प्रॉब्लेम आपल्या महाराष्ट्रातच असल्याची टीका ठाकरे यांनी भाजपवर केली.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.