Navi Mumbai Extortion Attack: नवी मुंबईतील तुर्भे परिसरात खंडणी न दिल्याच्या कारणावरून एका भंगार व्यवसायिकाच्या दुकानातील कामगारावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत शिवसेनेच्या नेत्या पूजा बनसोडे यांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुर्भे येथील इंदिरानगर परिसरात भंगार व्यवसाय करणारे संवेद्रकुमार सिंह यांच्याकडे आरोपींकडून दोन लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. खंडणीची रक्कम न दिल्यास परिसरात व्यवसाय करू देणार नाही, अशी धमकीही आरोपींनी दिली होती.
संवेद्रकुमार सिंह यांनी ही खंडणी देण्यास नकार दिला. या नकाराचा राग मनात धरून पाच जणांनी त्यांच्या दुकानात घुसून तेथे काम करणारे उमेश गौड यांच्यावर लोखंडी रॉडने बेदम मारहाण करत प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात उमेश गौड हे गंभीर जखमी झाले आहेत.
या प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी कारवाई करत शिवसेनेच्या नेत्या पूजा बनसोडे यांना अटक केली आहे. या गुन्ह्यातील उर्वरित चार आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
दिवसाढवळ्या घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे नवी मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.