ATM cash van seized Sarkarnama
प्रशासन

ATM cash van seized News : पवई पोलिसांनी पकडली एटीएम कॅश व्हॅन; 4 कोटी 70 लाख रुपयांची रक्कम जप्त !

Action by Mumbai Police in the wake of Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

Chaitanya Machale

Mumbai News : लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कारवाई करत पोलिसांनी एटीएम कॅश व्हॅन पकडली आहे. या गाडीतून पोलिसांनी 4 कोटी 70 लाख रुपयांची रक्कम जप्त केली आहे. ही रोकड घेऊन जाताना पवई पोलिसांनी ही कारवाई केली.

राज्यात 48 जागांसाठी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. लोकसभेच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून येत्या 13 मे रोजी चौथ्या तर 20 मे ला पाचव्या टप्प्याचे मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली असून आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने केल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवडणुकीचा काळ असल्याने पवई पोलीस (Police) स्टेशनच्या हद्दीमध्ये गार्डन बीट चौकीजवळ पवई पोलिसांकडून नाकाबंदी लावण्यात आली होती. या नाकाबंदीमध्ये कॅश व्हॅन गाडी जात असताना पवई पोलिसांनी गाडीला थांबून चौकशी केली. त्यावेळी ही कॅश नक्की कशासाठी नेली जात आहे, याची कोणतीही स्पष्ट माहिती देता न आल्याने पोलिसांनी या व्हॅन मधील रोख रक्कम जप्त केली.

ही गाडी थांबविल्यानंतर पवई पोलिसांनी इन्कम टॅक्स (Income Tax) आणि निवडणूक कार्यालयात याची माहिती दिली. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी या रक्कमेचे बारकोड स्कॅन केले असता हा बारकोड मिस मॅच झाला. यानंतर इन्कम टॅक्स विभागाच्या पथकाने ही रोख रक्कम आणि गाडीला आपल्या ताब्यात घेऊन ही रोकड कुठून आली. ही रक्कम एटीएम मध्ये भरण्यासाठी घेऊन जात होते, की निवडणुकीमध्ये या रोकडचा वापर केला जाणार होता का ? याचा अधिक तपास सुरू केला आहे.

निवडणुकीच्या काळात एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी रोख रक्कम नेण्यासाठी काही मर्यादा घालण्यात आलेल्या आहेत. निवडणुकीत मतांसाठी पैशाचा वापर होऊ शकतो, त्यामुळे निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार भरारी पथके नेमण्यात आली आहे. यापूर्वी देखील भरारी पथकांनी पुणे, पिंपरी-चिंचवड, वाघोली या परिसरातून मोठ्या प्रमाणात रोख रकमेचा साठा जप्त केला होता. पकडलेल्या रकमेची शहानिशा करून त्याबद्दल आवश्यक ते पुरावे सादर केल्यानंतर ही रक्कम संबधितांना परत केली जाते. अन्यथा ही रक्कम जप्त करून कोषागारात जमा करण्यात येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT