Vyanktesh Munde  Sarkarnama
प्रशासन

Beed ACB Action : लाच घेताना तहसीलदारला रंगेहाथ पकडले; बीडमध्ये एसीबीची मोठी कारवाई, प्रशासन हादरले!

Beed ACB caught tehsildar taking bribe: बीडमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने परळी तहसील कार्यालयात मोठी कारवाई केली आहे.

सरकारनामा ब्युरो

ACB caught red handed: बीडमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने परळी तहसील कार्यालयात मोठी कारवाई केली आहे. शेतकऱ्याकडून 20 हजार रुपयांची लाच घेत असताना तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी दुपारी केली. शेतकऱ्याने केलेल्या तक्रारीनंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. या कारवाईमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी तक्रारदाराकडून ऐपतीचे प्रमाणपत्र देण्यासाठी 50 हजार रुपयांची तहसीलदारांकडून मागणी करण्यात आल्याची तक्रार बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. या तक्रारीनंतर लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचला होता. त्यानुसार परळी येथील तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले.

तक्रारदार शेतकीऱ्याकडे सुरुवातीला 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. मात्र, तडजोडीनंतर 20 हजार रुपयांवर सौदा ठरल्याची माहिती समोर आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदारांना लाच घेताना पकडण्यात आले.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर पथकाने पडताळणी करून सापळा रचला. दरम्यान तक्रारदाराच्या हालचालींवर संशय आल्यानंतर तहसीलदार मुंडे यांनी पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ केल्याचे सांगण्यात येत आहे.तरीही एसीबीने आवश्यक पुरावे संकलित करत पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.

लाचखोरीच्या या घटनेमुळे परळी तालुक्यातील महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली असून जिल्ह्यातही या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास बीड एसीबीकडून केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT