BJP News : भाजप आमदाराला हृदयविकाराचा त्रास : रुग्णालयात उपचार सुरु; CM फडणवीसांनी विमानचे टेकऑफ थांबवून केली चौकशी

BJP News : भाजप आमदार किशोर जोरगेवार यांना हृदयविकाराच्या त्रासामुळे सीएचएल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
BJP MLA Kishor Jorgewar
BJP MLA Kishor JorgewarSarkarnama
Published on
Updated on

BJP News : भाजपचे चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांना चंद्रपूर येथील सीएचएल रुग्णालयात काल (गुरुवारी) दाखल करण्यात आले आहे. त्यांना हृदयविकाराचा त्रास जाणवून लागल्याने आणि अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात नेण्यात आले. तपासणीदरम्यान त्यांच्या हृदयातील एका रक्तवाहिनीत ब्लॉकेज असल्याचे समोर आले.

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याची माहिती मिळताच त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून आमदार जोरगेवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मागील दोन महिन्यांपासून आमदार जोरगेवार सातत्याने व्यस्त होते. आज दुपारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने सीएचएल रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयातच आमदार जोरगेवार यांच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. अँजिओग्राफी करण्यात आली असता त्यांच्या हृदयातील एका रक्तवाहिनीत ब्लॉकेज असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर रात्री उशिरा अँजिओप्लास्टी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

BJP MLA Kishor Jorgewar
Chandrapur Mayor : ठाकरेसेना अन् भाजपमध्ये महापौरपदासाठी '6 खोक्यांची' डील? मनसेच्या आरोपांवर चंद्रपूरच्या जिल्हाध्यक्षांचं प्रतिआव्हान

दरम्यान, आग्रा दौऱ्यावर जाण्यासाठी विमानतळावर पोहोचलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार जोरगेवार यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी सुमारे 10 मिनिटे विमान थांबवून त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला आणि प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर ते आग्रासाठी रवाना झाले.

मुख्यमंत्री फडणवीस आग्रा दौऱ्यावर :

गुरुवारी, शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी किल्ले शिवनेरी येथे उपस्थित होते. त्यानंतर ते आग्रासाठी रवाना झाले. आग्रा येथील लाल किल्ल्यावर आयोजित "शिवजन्मोत्सव संपूर्ण भारतवर्ष २०२६" कार्यक्रमात ते उपस्थित होते. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. आग्रा किल्ल्यावरील या भव्य समारंभात मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

BJP MLA Kishor Jorgewar
Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार की प्रतिभा धानोरकर, चंद्रपूरची सत्ता कोणामुळे गेली? दिग्गज माजी मंत्री दिल्लीला पाठवणार सविस्तर अहवाल

कार्यक्रमादरम्यान फडणवीस म्हणाले की, मराठा इतिहास गौरवशाली आहे आणि शिवाजी महाराजांनी कधीही मुघल शासक औरंगजेबासमोर शरणागती पत्करली नाही. तसेच बऱ्याच काळापासून शैक्षणिक अभ्यासक्रमात मराठ्यांच्या इतिहासाला आवश्यक स्थान मिळाले नाही. पूर्वी एनसीईआरटी आणि सीबीएसईच्या पुस्तकांमध्ये मुघल साम्राज्यावर १७ पानांचा आणि शिवाजी महाराजांवर फक्त एकच परिच्छेद होता. अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. परंतु आता परिस्थिती बदलली आहे, मराठा साम्राज्याला अधिक महत्त्व दिले जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com