Congress MLAs Tour : नेतृत्व बदलाच्या वादळात २१ आमदार थेट परदेश दौऱ्यावर, राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण

CM siddaramaiah Vs DK shivakumar: मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील नेतृत्व बदलाच्या शक्यतेवरून कर्नाटक काँग्रेसमध्ये अंतर्गत हालचालींना वेग आला आहे.
Congress
Congress Sarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेसमधील नेतृत्व बदलाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर २१ आमदार ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत.

  2. हा दौरा अभ्यासासाठी असल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले, मात्र नंतर काही आमदारांनी तो वैयक्तिक असल्याचे स्पष्ट केले.

  3. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील संभाव्य नेतृत्व बदलाच्या चर्चांमुळे या दौऱ्याकडे राजकीय दृष्टीने पाहिले जात आहे.

Congress power struggle: कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या नेतृत्व बदलाच्या चर्चांना वेग आला असतानाच सुमारे २१ काँग्रेस आमदार कुटुंबासह ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. मंगळवारी (ता. १७) रात्री बंगळूरच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिला गट निघाला. तर उर्वरित आमदार आज रवाना होणार असल्याची माहिती आहे.

हा दौरा सुमारे १३ दिवसांचा असून, तीन मार्चपर्यंत ते बंगळुरात परतणार आहेत. सुरुवातीला हा दौरा पशुसंवर्धन व कृषी क्षेत्रातील अभ्यासासाठी असल्याची चर्चा होती. मात्र, त्याला विरोध झाल्यानंतर काही आमदारांनी हा वैयक्तिक दौरा असल्याचे स्पष्ट केले. पण मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील नेतृत्व बदलाच्या शक्यतेवरून अंतर्गत हालचालींना वेग आला असून हा दौरा त्याचाच भाग असल्याची आता चर्चा रंगली आहे.

नेतृत्व बदलाच्या चर्चांना वेग आला असतानाच हा दौरा ठरल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. सुरुवातीला हा दौरा पशुसंवर्धन व कृषी क्षेत्रातील अभ्यासासाठी असल्याची चर्चा होती. मात्र, त्याला विरोध झाल्यानंतर काही आमदारांनी हा वैयक्तिक दौरा असल्याचे स्पष्ट केले. या पहिल्या गटात काँग्रेस आमदार पुट्टरंगशेट्टी, एच. डी. तिम्मय्या, हम्पनगौडा बादरली, देवेन्द्रप्पा, बी. एम. नागराज तसेच विधान परिषद सदस्य वसंत कुमार यांचा समावेश आहे.

Congress
Congress News : बड्या नेत्याची काँग्रेसला सोडचिठ्ठी, लगेच राहुल गांधींचा फोन; मुख्यमंत्र्यांनी थेट घर गाठलं, भाजपमध्ये प्रवेश ठरला...

मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील नेतृत्व बदलाच्या शक्यतेवरून अंतर्गत हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. दिल्ली भेटीदरम्यान शिवकुमार यांनी पक्षाच्या हायकमांडशी चर्चा केल्याचे बोलले जात आहे. करारानुसार नेतृत्व बदल करावा, अशी मागणी काही आमदारांनी केल्याच्या बातम्या आहेत.

मात्र, आमदारांनी या सर्व राजकीय चर्चांना फेटाळून लावले आहे. जागरलूरचे आमदार देवेन्द्रप्पा यांनी सांगितले की, सुमारे २१ आमदार वैयक्तिक खर्चाने परदेश दौऱ्यावर जात आहोत. कोणत्याही राजकीय कारणासाठी हा दौरा नाही. दोन महिन्यांपूर्वीच आम्ही हा कार्यक्रम ठरवला होता. आमच्या दौऱ्याला कोणीही प्रायोजित केलेले नाही. आम्ही सर्व काँग्रेसचेच आहोत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आमच्यासाठी दोन्ही डोळ्यांसारखे आहेत.

पशुसंवर्धन मंत्री के. वेंकटेश यांनीच हा दौरा आयोजित केल्याची चर्चा होती. मात्र, त्यांनी स्पष्ट केले की, माझ्या विभागाकडून कोणताही दौरा आयोजित केलेला नाही. मी स्वतःही परदेश दौऱ्यावर जात नाही. अर्थसंकल्पामुळे मी येथेच आहे. मंत्री भैरती सुरेश यांनी हा दौरा आयोजित केल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. तर शिवकुमार म्हणाले की, या दौऱ्याबाबत माध्यमांतूनच माहिती मिळाली आहे. हा त्यांचा वैयक्तिक दौरा आहे की, कोणीतरी प्रायोजित केला आहे, याची मला माहिती नाही.

Congress
Pune Congress Bhavan: महापौर मंजुषा नागपुरेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी काँग्रेस हायकोर्टात जाणार; पहिला दगड कोणी भिरकावला? याचाही फैसला तिथंच होणार

FAQs :

1. कर्नाटकातील किती काँग्रेस आमदार परदेश दौऱ्यावर गेले आहेत?
सुमारे २१ आमदार ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेले आहेत.

2. हा दौरा अधिकृत आहे की वैयक्तिक?
सुरुवातीला अभ्यास दौरा असल्याचे सांगण्यात आले, मात्र काही आमदारांनी तो वैयक्तिक दौरा असल्याचे स्पष्ट केले.

3. नेतृत्व बदलाच्या चर्चांचा या दौऱ्याशी संबंध आहे का?
अधिकृतपणे काहीही स्पष्ट झाले नसले तरी राजकीय वर्तुळात तसा अंदाज व्यक्त केला जात आहे.

4. आमदार किती दिवस परदेशात राहणार आहेत?
हा दौरा सुमारे १३ दिवसांचा असून ते तीन मार्चपर्यंत परतण्याची शक्यता आहे.

5. या घडामोडींचा राज्य सरकारवर परिणाम होईल का?
नेतृत्व बदलाच्या शक्यतेमुळे पुढील राजकीय समीकरणांवर परिणाम होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com