Job Opportunity Sarkarnama
प्रशासन

Job Opportunity In IDBI : 'आयडीबीआय' मध्ये सहायक व्यवस्थापक पदांची बंपर भरती; 500 जागा भरणार!

Anand Surwase

Bank Recruitment :  सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी बँकेमध्ये सहायक व्यवस्थापक म्हणून काम करण्याची सुवर्ण संधी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाने (IDBI) भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी पदवीधर उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात.. (Job Opportunity in IDBI)

आयडीबीआयच्या वतीने ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर (JAM) या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. बँकेकडून एकूण 500 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरती अंतर्गत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 203 जागा, एससी - 75, एसटी- 37 आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 50, इतर मागासवर्गासाठी 135 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेतून पदवी पूर्ण केलेला असावा. तसेच उमेदवारास संगणक चालविता येणे आवश्यक आहे. या भरतीसाठी उमेदवाराचे वय दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी 20 ते 25 वर्षे इतके असावे. तसेच सरकारने नियमानुसार मागासवर्गीय उमेदवारांना कमाल 05 वर्षे वयाची सूट, तर OBC साठी 03 वर्षे जास्तीच्या वयाची सूट दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने आपला पासपोर्ट साईज फोटो आणि सही स्कॅन करून घ्यावी. त्यानंतर आय https://www.idbibank.in या अधिकृत संकेतस्थळावरील करीअर सेक्शनमध्ये लॉगिन करणे गरजेचे आहे. त्यानंतर अर्जाशी संबंधित माहिती अचूक पद्धतीने भरून घ्यावी. या अर्जासाठी उमेदवारांकडून खुल्या आणि ओबीसी प्रवर्गासाठी 1000/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी 200/- रुपये शुल्क आकारले जाणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 26 फेब्रुवारी 2024 आहे.

तसेच या भरतीसाठी बँकेकडून परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड केली जाणार आहे. याबाबतची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बँकेने प्रसिद्ध केलेली सविस्तर जाहिरात पाहावी. https://www.idbibank.in/pdf/careers/Detailed-Advertisement-PGDBF-2024-25.PDF

(Edited By - Chetan Zadpe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT