Smita Sabharwal, Pooja Khedkar Sarkarnama
प्रशासन

IAS Smita Sabharwal : पूजा खेडकर प्रकरणावर प्रतिक्रिया दिली अन् वादात अडकल्या; स्मिता सभरवाल का आहेत चर्चेत?

Rashmi Mane

IAS Smita Sabharwal : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत वाद सुरू आहे. देशभर हे प्रकरण चांगलेच गाजत आहे. रोज नवीन नवीन खुलासे समोर येत आहे. एकीकडे हे प्रकरण सुरु असतानाच दुसरीकडे मात्र, पूजा प्रकरणाच्या संदर्भात भाष्य करणं अन्य एका महिला आयएएस अधिकाऱ्याला भारी पडलं आहे. स्मिता सभरवाल यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेतील अपंग कोट्याचा 'गैरवापर आणि पुनरावलोकन' यावर भाष्य केले आहे.

या वादात तेलंगणामधील वित्त आयोगाच्या सदस्या आयएएस स्मिता सभरवाल यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन प्रश्न उपस्थित केला आहे. सध्या सोशल मीडियावर ही पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. स्मिता सभरवाल (Smita Sabharwal) यांनी प्रशासकीय सेवांमध्ये अपंगत्व कोट्याच्या गरजेवरचं आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यावरून नवीन वादाला तोंड फुटले आहे.

स्मिता सभरवाल म्हणाल्या, "अपंगांसाठी पूर्ण आदर आहे, परंतु कोणतीही एअरलाइन अपंग वैमानिकाची नियुक्ती करते का? किंवा तुम्ही एखाद्या अपंग सर्जनवर विश्वास ठेवता? AIS (IAS/ /IPS/IFS/IFOS) चे स्वरूप म्हणजे फील्ड-वर्क, कामाचे दीर्घ तास, लोकांच्या तक्रारी थेट ऐकणे - ज्यासाठी शारीरिक तंदुरूस्तीची आवश्यकता आहे, या विभागात कोट्याची खरचं आवश्यकता का आहे!" मात्र, या पोस्टमुळे सभरवाल यांच्या पोस्टनंतर त्यांना बऱ्याच वाईट कमेंटना सामोरे जावे लागले.

सभरवाल यांच्या पोस्टवर प्रियांका चतुर्वेदीं केली कमेंट

सभरवाल यांच्या पोस्टवर शिवसेना (UBT) खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी पोस्ट केले, 'हा एक अतिशय दयनीय आणि बहिष्काराचा दृष्टीकोन आहे. नोकरशहा देखील त्यांची मर्यादित मते आणि विशेषाधिकार कसे दाखवतात हे पाहणे मनोरंजक आहे.

प्रियांका चतुर्वेदीला उत्तर देताना स्मिताने लिहिले की, 'मॅडम, संपूर्ण आदराने, जर नोकरशहा प्रशासनाच्या संबंधित मुद्द्यांवर बोलणार नाहीत, तर कोण बोलणार? माझी मते आणि चिंता 24 वर्षांच्या कारकिर्दीतून आहेत... मर्यादित अनुभव नाही.

कृपया दृश्य पूर्णपणे वाचा. मी म्हटले आहे की इतर केंद्रीय सेवांच्या तुलनेत #AIS च्या मागण्या वेगळ्या आहेत. प्रतिभावान दिव्यांगांना नक्कीच मोठ्या संधी मिळू शकतात.

सभरवाल यांच्या पोस्टवर प्रियांका चतुर्वेदी यांची कमेंट

सभरवाल यांच्या पोस्टवर शिवसेना (UBT) खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पोस्ट केले, 'हा एक अतिशय दयनीय आणि बहिष्काराचा दृष्टीकोन आहे. नोकरशहा देखील त्यांची मर्यादित मते आणि विशेषाधिकार कसे दाखवतात हे पाहणे मनोरंजक आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT