ips transfer .jpg Sarkarnama
प्रशासन

IPS Transfer List : राज्य सरकारचा बदल्यांचा धडाका कायम; आता पुन्हा 'या' 13 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची बदली

13 IPS Officer Trasnfer Orders : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून प्रशासनातील बदल्यांचा धडाका कायमच आहे. आतापर्यंत अनेक वरिष्ठ आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

Deepak Kulkarni

Mumbai News : महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यात आयपीएस आणि आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्यांचा धडाका लावला आहे. नव्या वर्षात राज्य सरकारकडून सहापेक्षा अधिकवेळा बदल्यांची ऑर्डर काढण्यात आली आहे. त्यामुळे राजकीयसह सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अशातच आता राज्य सरकारकडून 13 आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून प्रशासनातील बदल्यांचा धडाका कायमच आहे. आतापर्यंत अनेक वरिष्ठ आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या (Transfer Orders) करण्यात आल्या आहेत. आता शुक्रवारी(ता.28)पुन्हा एकदा वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे राज्य सरकारकडून जारी करण्यात आले आहेत.

राज्याच्या गृहखात्याने याबाबतचा आदेश काढण्यात आला आहे.त्यामध्ये राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपद,राज्य गुन्हे अभिलेख केंद्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षक,विशेष पोलिस महानिरीक्षक,राज्य राखीव पोलिस बल विशेष पोलिस महानिरीक्षक,सायबर सेलचे अपर पोलिस महासंचालक,आर्थिक गुन्हे शाखा अपर पोलिस महासंचालक यांसारख्या पदांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

मनोज कुमार शर्मां,अशोक मोराळे,यशस्वी यादव,सूरेश मेखला,सुहास वारके,अश्वती दोर्जे,के एम मल्लिकार्जुन,निखील गुप्ता,राजीव जैन, यांसह अनेक आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली करण्यात आली आहे.

मनोज कुमार शर्मां- कायदा व सुव्यवस्था- विशेष पोलिस महानिरीक्षक

यशस्वी यादव - अपर पोलिस महासंचालक, सायबर सेल

आर बी डहाळे - गुन्हे अभिलेख केंद्र- विशेष पोलिस महानिरीक्षक

अशोक मोराळे - मोटार परिवहन विभाग- विशेष पोलिस महानिरीक्षक,

सुहास वारके - अपर पोलिस महासंचालक, कारागृह आणि सुधारसेवा

छेरिंग दोर्जे - विशेष अभियान- अपर पोलिस महासंचालक

के एम मल्लिकार्जुन - प्रशासन- अपर पोलिस महासंचालक

अभिषेक त्रिमुखे - उत्तर प्रादेशिक विभाग- अपर पोलिस आयुक्त

श्रेणिक लोढा - खामगाव बुलढाणा- अपर पोलिस अधीक्षक

सुरेश मेखला - अपर पोलिस महसंचालक, आर्थिक गुन्हे शाखा

राजीव जैन - राज्य राखीव पोलिस बल- विशेष पोलिस महानिरीक्षक

निखील गुप्ता - कायदा आणि सुव्यवस्था अपर पोलिस महसंचालक

अश्वती दोर्जे - अपर पोलिस महासंचालक, महिला आणि बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT