Internal transfers of Pimpri Chinchwad Police  Sarkarnama
प्रशासन

Pune Police Transfer: लोकसभा निवडणुकीचा 'फिव्हर'; पिंपरी चिंचवड पोलिस दलात खांदेपालट

उत्तम कुटे

Pimpri News: लोकसभा निवडणूक मार्च महिन्यात जाहीर होण्याची शक्यता असून त्यासाठी प्रशासनाची तयारी आतापासून सुरु झाली आहे. त्याचा प्रत्यय पोलिस खात्यात आला आहे. अधिकारी पातळीवर मोठ्या प्रमाणावर खांदेपालट शनिवारपासून (ता.13) सुरु झाली असून ती आज (ता.14) सुट्टीच्या दिवशीही उद्योगनगरीत सुरुच राहिली.

मे-जूनमध्ये होणाऱ्या या रुटीन बदल्या नसून त्या इलेक्शन ट्रान्सफर आहेत. त्याला शहर पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी एसीपी सतीश माने यांनी थोड्या वेळापूर्वी 'सरकारनामा'शी बोलताना दुजोरा दिला. या नियमित नाही, तर निवडणूक बदल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आणखी काही अधिकाऱ्यांच्याही बदल्या होणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यातून स्थानिक रहिवासी असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांकडील निवडणुकीवर परिणाम करू शकणारे चार्ज काढून घेण्य़ात येऊन त्यांना साईडलाईन केले जात आहे. म्हणजे थेट निवडणूक, राजकीय पक्ष वा त्यांचे उमेदवार यांच्याशी सबंध न येणाऱ्या विभागात त्यांना पोस्टिंग दिली जात आहे.

पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शनिवारी (ता.13) डीसीपी लेवलवर पूर्ण खांदेपालट केला. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी आणि निवडणूक आयोगाच्या निकषांनुसार सर्व सहा डीसीपींच्या बदल्या केल्या.

क्राईम ब्रॅंचची जबाबदारी स्वप्ना गोरे यांच्याकडून झोन 3 चे डीसीपी संदीप डोईफोडे, तर गोरेंकेडे झोन 1 ची जबाबदारी दिली गेली. स्पेशल ब्रॅंचचे शिवाजी पवार यांच्याकडे झोन ३, ट्राफिकचे बापू बांगरांकडे झोन दोन, तर तेथील डॉ.काकासाहेब डोळे यांना हेडक्वॉर्टर देण्यात आले. झोनचे एकचे विवेक पाटील यांच्याकडे वाहतूक विभागाची जबाबदारी आता देण्यात आली आहे.

दरम्यान, डीसीपी (हेडक्वॉर्टर) म्हणून काल (ता.3) बदली झालेले डॉ.डोळे यांनी आज लगेच चार्ज घेतल्यानंतर काही तासांतच शहर पोलिस दलातील 18 एपीआय आणि 41 पीएसआयच्या सामूहिक बदल्यांचा आदेश रविवारी काढला.

तसेच लगेचच त्यांना बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे फर्मानही त्यांनी सोडले. यानंतर आता पीआय आणि एसीपींच्या बदल्या होणार आहेत. मात्र, कर्मचारी पातळीवर त्या केल्या जाणार नसल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले. त्यांच्या बदल्या इलेक्शन झाल्यावर या रुटीनपणे होतील, असा अंदाज आहे.

(Edited By- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT