Pune Police Sarkarnama
प्रशासन

Kolhapur Police: काळ्या मायेचा मोह नडला, तीन पोलिसांचे निलंबन; जिल्हा पोलिस अधिक्षकांची कारवाई

Crime News: फुलेवाडी रिंगरोडवरील अवैद्य धंद्याना कोणाचा वरदहस्त ?

Rahul Gadkar

Kolhapur News: अवैद्य धंदे करणाऱ्यांसोबत हितसबंध, कर्तव्यात कसुर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला फाट्यावर बसवून काम करणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तिघांवर कारवाई करण्यात आली आहे. काळ्या मायेचा मोह या तिघांना नडला असून जिल्हा पोलिस प्रमुखांनी तीन पोलिसांना निलंबित केले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) शाखेतील सहायक फौजदारांसह तीन पोलिसांवर कारवाई केली आहे.

पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी मंगळवारी कारवाई केली असून जिल्ह्यातील पोलिस दलात खळबळ उडाली आहे. सहायक फौजदार संभाजी कृष्णांत भोसले, हवालदार पांडुरंग तुकाराम पाटील, कॉन्स्टेबल संदीप ज्ञानदेव गायकवाड, अशी कारवाई झालेल्या पोलिसांची नावे आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील आणि शहरातील आणखी काहीजण जिल्हा पोलिस प्रमुखांच्या रडारवर असल्याची माहिती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या काही वर्षांपासून स्थानिक गुन्हे आणि अन्वेषण शाखा ही चर्चेत आली होती. लाच घेण्यापासून ते गुन्हेगारांना अभय देण्यापर्यंत कारणाने सुरू झाल्या असल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुखांना मिळाली होती. त्यानंतर झालेल्या चौकशीत अनेकांचे अवैध धंद्याशी लागेबंधे असल्याचे स्पष्ट झाले होते. दिवाळीनंतर अनेक पोलिस ठाण्यात साफसफाई होणार याचा अंदाज आला होता. मात्र, काही कारणामुळे निलंबनाची करावी लांबवली होती. अखेर जिल्हा पोलिस प्रमुखांनी या तीन पोलिसांना निलंबित केले आहे.

फुलेवाडी रिंग रोडवर कोणाचा वरदहस्त ?

जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंडित यांनी कारवाई केल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत खळबळ उडाली आहे. मात्र, फुलेवाडी रिंग रोड परिसरात अवैद्य धंद्यानी डोके वर काढले आहे. फुलेवाडी नाका परिसर, भगवा चौक, बोंद्रेनगर चौक, गंगाई लॉन, दत्त कॉलनी, क्रांतिसिंह नाना पाटील नगर या ठिकाणी मटका जोरात सुरु झाला आहे.

शिवाय पोलिसांच्या नाकावर टिचून या ठिकाणी रस्त्यावर खास शेडची उभारणी केली आहे. कोण भाजी घेताना तर कोण वडापाव खाताना मटका खेळण्यास शेडात जातो. रस्त्यावरच ही शेड उभारण्यात आल्याने पोलिसांना याची खबर कशी काय नाही ? असा सवाल उपस्थित होत आहे. शिवाय याच विभागातील कोणाचा तरी वरदहस्त आहे का ? असा शंकेचा धूर उडत आहे. त्यामुळे याकडे पोलिस प्रशासन लक्ष देणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

(Edited by- Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT