IAS Tukaram Munde Sarkarnama
प्रशासन

IAS Tukaram Munde : तुम्हाला माहित आहे का तुकाराम मुंडेंनी मतदान केले का...? आणि कुठे...?

Lok Sabha Election 2024 : आपण सर्व लोक म्हणजेच लोकशाही. मतदान करा. मतदान हा फक्त हक्क नव्हे; तर संविधानिक व नैतिक जबादारी आहे. मतदान करणे आपल्या सर्वांची सर्वोच्च जबाबदारी आहे, अशा शब्दांत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी केले आहे.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 20 May : तुकाराम मुंडे नाव उच्चारताच शिस्तप्रिय आणि कडक बाण्याचे सनदी अधिकारी डोळ्यासमोर उभे राहतात. मुंडे हे मूळचे बीड जिल्ह्यातील ताडसोना या गावचे आहेत. मात्र, सनदी अधिकारी असलेल्या मुंडेंची नियुक्ती सध्या राजाच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभागात सचिवपदी आहे, त्यामुळे मुंडे यांनी आज सकाळीच मुंबईतील मलबार हिल परिसरातील मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावले.

तुकाराम मुंडे (Tukaram Munde) धडाडीचे सनदी अधिकारी म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. वक्तशीरपणा आणि कर्तव्यात बजावताना कोणतीही तडजोड न स्वीकारणारे अधिकारी म्हणून मुंडेंना ओळखले जाते. पदावर असताना त्या पदाला संपूर्ण न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यातूनच त्यांना अनेकदा मुदतीच्या अगोदरच बदलीला तोंड द्यावे लागले आहे. सध्या ते मुंबईत (Mumbai) राज्याच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभागात सचिवपदी नियुक्त आहेत.

मूळचे बीड (Beed) जिल्ह्यातील असलेले तुकाराम मुंडे सध्या मुंबईत कार्यरत आहेत, त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी आज मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातील मलबार हिल विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क पत्नीसह बजावला आहे. मतदानानंतर त्याबाबतची पोस्ट फेसबुकवर टाकत नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

We The People. आपण सर्व लोक म्हणजेच लोकशाही. मतदान करा. मतदान हा फक्त हक्क नव्हे; तर संविधानिक व नैतिक जबादारी आहे. मतदान करणे आपल्या सर्वांची सर्वोच्च जबाबदारी आहे, अशा शब्दांत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी केले आहे.

दरम्यान, सनदी अधिकारी तुकाराम मुंडे आपल्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे एका पदावर जास्त काळ राहू शकले नाहीत. त्यांच्या प्रशासकीय सेवेच्या १८ वर्षांच्या कार्यकाळात त्यांच्या तब्बल २१ वेळा बदल्या झाल्या आहेत. सोलापूर येथे २००५ मध्ये मुंडे यांची प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मुंडे यांनी त्या ठिकाणी धडाकेबाज काम केले. त्यानंतर त्यांची बदली करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या बदल्या वारंवार होत राहिल्या.

सनदी अधिकारी तुकाराम मुंडेंची प्रशासकीय कारकिर्द

ऑगस्ट २००५ - प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी सोलापूर.

सप्टेंबर २००७ - उप जिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग.

जानेवारी २००८ - सीईओ, जिल्हा परिषद नागपूर.

मार्च २००९ - आयुक्त, आदिवासी विभाग.

जुलै २००९ - सीईओ, वाशिम.

जून २०१० - सीईओ, कल्याण.

जून २०११ - जिल्हाधिकारी, जालना.

सप्टेंबर २०१२ - विक्रीकर सहआयुक्त मुंबई.

नोव्हेंबर २०१४ - सोलापूर जिल्हाधिकारी.

मे २०१६ - आयुक्त, नवी मुंबई महापालिका.

मार्च २०१७ - मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएल, पुणे.

फेब्रुवारी २०१८ - आयुक्त, नाशिक महापालिका.

नोव्हेंबर २०१८ - सहसचिव, नियोजन.

डिसेंबर २०१८ - प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई.

जानेवारी २०२० - आयुक्त, नागपूर महापालिका.

ऑगस्ट २०२० - सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई.

जानेवारी २०२१ - राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत.

सप्टेंबर २०२२ - आयुक्त आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान.

२९ नोव्हेंबर २०२२ - नियुक्तीच्या प्रतीक्षेत

एप्रिल २०२३ - सचिव पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT