Local Body Election  Sarkarnama
प्रशासन

Local Body Election : सातारा ZP साठी साडेसव्वीस लाख मतदार करणार मतदान; तब्बल 6244 मतदान यंत्रे लागणार

Satara Political News : सातारा जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू असून जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. पंचायत समिती सभापतींची सोडत पुढील आठवड्यात होणार आहे.

उमेश भांबरे
  1. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ जानेवारी २०२६ पूर्वी निवडणुका पूर्ण करायच्या आहेत.

  2. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाले असून पंचायत समितींच्या सभापतींच्या आरक्षणाची सोडत पुढील आठवड्यात होणार आहे.

  3. साताऱ्यातील २६.६६ लाख मतदारांसाठी २८३८ मतदान केंद्रे व ३१२२ कंट्रोल युनिट आणि ६२४४ बॅलेट युनिट लागणार आहेत.

Satara, 30 September : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सातारा जिल्हा प्रशासनाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सध्या युद्ध पातळीवर तयारी करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. पंचायत समितीच्या सभापतींच्या आरक्षणाची सोडत पुढील आठवड्यात होणार आहे, त्यामुळे इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. दुसरीकडे, प्रशासनाने निवडणुकीची तयारी सुरू केली असून जिल्ह्यासाठी ६ हजार २४४ मतदान यंत्रे लागणार आहेत.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Election) गेल्या चार वर्षांपासून रखडल्या होत्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली असून सध्या मतदारसंख्या आणि त्यासाठी लागणारे बॅलेट यंत्रांची (मतदान यंत्र) जुळवाजुळव सुरू आहे.

सातारा (Satara) जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील अकरा पंचायत समित्‍यांची निवडणूक प्रक्रिया सध्या आघाडीवर आहे. जिल्ह्यात उपलब्ध दोन, तीन हजार मतदान यंत्रांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. या यंत्रांमध्ये काही बिघाड असेल, तर ती यंत्रे बाजूला ठेवली जातील. तेवढीच यंत्रे नव्याने मागवली जाणार आहेत. सध्या मतदार यादीबरोबरच ईव्हीएम मशिनची जुळवाजुळव सुरू आहे.

सातारा जिल्हा प्रशासनाने २६ लाख ६६ हजार २९६ मतदार (एक जुलै २०२५ ची मतदार यादी) नजरेसमोर ठेवून सुमारे २ हजार ८३८ मतदार केंद्रे गृहीत धरण्यात आली आहेत. त्‍यासाठी सातारा जिल्ह्याला एकूण सहा हजार २४४ बॅलेट युनिट, तर ३१२२ कंट्रोल युनिटची आवश्यकता असणार आहे, त्यामुळे जिल्हा प्रशासनाला आता मतदान यंत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

यावेळी निवडणुकीसाठी साधारण २८३८ मतदान केंद्रे ग्राह्य धरून यंत्रांची जुळवाजुळव केली जात आहे. यावेळेस ३१२२ कंट्रोल युनिट आणि ६२४४ बॅलेट युनिट लागणार आहेत; पण उमेदवार संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन दहा टक्के जादा कंट्रोल युनिट व २० टक्के जादा बॅलेट युनिट उपलब्ध ठेवले जाणार आहेत.

तालुके आणि मतदान केंद्रे

सातारा ३६५, कऱ्हाड ४८६, पाटण ४०१, कोरेगाव २५३, जावळी १५४, माण २१३, खटाव २८५, फलटण २७८, खंडाळा ११४, वाई १८०, महाबळेश्वर १०९. एकूण मतदान केंद्रे : २८३८.

तालुकानिहाय कंट्रोल युनिट व कंसात बॅलेट युनिट

सातारा ४०२ (८०४), कऱ्हाड ५३५ (१०७०), पाटण ४४१ (८८२), कोरेगाव २७८ (५५६), जावळी १६९ (३३८), माण २३४ (४६८), खटाव ३१४ (६२८), फलटण ३०६ (६१२), खंडाळा १२५ (२५०), वाई १९८ (३९६), महाबळेश्वर १२० (२४०). एकूण ३१२२ कंट्रोल युनिट आणि ६२४४ बॅलेट युनिटची आवश्यकता आहे.

सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कोणासाठी राखीव आहे?
👉 ओबीसी महिला प्रवर्गासाठी.

प्रश्न 2 : जिल्ह्यात किती मतदान केंद्रे राहणार आहेत?
👉 २८३८ मतदान केंद्रे.

प्रश्न 3 : निवडणुकीसाठी किती मतदान यंत्रांची आवश्यकता आहे?
👉 ३१२२ कंट्रोल युनिट व ६२४४ बॅलेट युनिट.

प्रश्न 4 : निवडणुका केव्हा पूर्ण करणे बंधनकारक आहे?
👉 ३१ जानेवारी २०२६ पूर्वी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT