Pune Mahapalika sarkarnama
पुणे

Pune Mahapalika News : आचारसंहितेच्या भीतीने महापालिकेत टेंडरची लगीनघाई...

Projects tender आज होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीसाठी 129 कोटी रुपयांची 47 टेंडर मंजुरीसाठी ठेवण्यात आली आहेत. यामध्ये शहरातील विविध भागातील महत्त्वाच्या कामात सोबतच पालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या विविध गावांमधील प्रकल्पांचा समावेश आहे.

Chaitanya Machale

Pune News : लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर टेंडर काढण्यास अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर कोट्यवधी रुपयांची टेंडर काढून ती आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मान्य करण्याचा निर्धार महापालिका प्रशासनाने केला आहे. लोकसभेसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा राजकीय पक्षांकडून सुरू झाली आहे. पुणे लोकसभेसाठी भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे नाव जाहीर केले असून, येत्या दोन ते तीन दिवसांत काँग्रेसच्या वतीने लोकसभेची निवडणूक कोण लढणार याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.

लोकसभेची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर कोणत्याही विकासकामांचे टेंडर काढता येत नाही. टेंडर प्रक्रिया झाली नसल्यास काम करण्यास प्रशासनाला अडथळा निर्माण होतो. हे टाळण्यासाठी आता महापालिका आयुक्तांनी आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी अधिकाधिक टेंडर काढून ती स्थायी समितीमध्ये मान्य करून घेण्याचा निर्धार केला आहे. महापालिकेची स्थायी समितीची बैठक आठवड्यातून एकदा होत असते. आज गुरुवारी स्थायी समितीची बैठक होणार आहे. पुढील आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.

आज होणारी समितीची बैठक ही अखेरची बैठक होऊ शकते. या पार्श्वभूमीवर या बैठकीत अधिकाधिक प्रस्ताव मांडून ते मंजूर करून घेण्याचा प्रयत्न महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केला आहे. आज होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीसाठी 129 कोटी रुपयांची 47 टेंडर मंजुरीसाठी ठेवण्यात आली आहेत. यामध्ये शहरातील विविध भागातील महत्त्वाच्या कामात सोबतच पालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या विविध गावांमधील प्रकल्पांचा समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर टेंडर मान्य नसल्यास कामे करताना अडथळा येऊ शकतो. आचारसंहितेचा प्रक्रियेत ही विकासकामे खोळंबू नयेत, यासाठी राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारने पालिका प्रशासनाला काही सूचना केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अधिकाधिक टेंडर काढून त्याला तांत्रिकदृष्ट्या मान्यता घेण्यासाठी स्थायी समिती समोर ठेवण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाच्या वतीने केला जात असल्याची चर्चा आता महापालिकेत सुरू झाली आहे. आज गुरुवारी होणाऱ्या समितीच्या बैठकीसमोर अनेक मोठ्या प्रकल्पांची टेंडर मान्यतेसाठी ठेवण्यात आली आहेत.

आयत्यावेळेस प्रस्ताव मान्यतेसाठी येणार...

गुरुवारी होणारी स्थायी समितीची बैठक ही अखेरची ठरण्याची शक्यता आहे. पुढील दोन-तीन दिवसांत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यास कोणताही निर्णय प्रशासनाला घेता येणार नाही. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीमध्ये आयत्या वेळेस अनेक प्रस्ताव दाखल होऊन ते मान्य होण्याची शक्यता आहे. यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागातील विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे प्रस्ताव तसेच वेगवेगळ्या प्रकल्पांच्या कामांच्या वर्क ऑर्डर मिळण्यासाठी ते प्रस्ताव दाखल होतील अशी चर्चा सुरू झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या कामांचे टेंडर मान्यतेसाठी...

घोरपडी येथील पुणे मिरज रेल्वेलाइनवर उड्डाणपूल बांधणे, विश्रांतवाडी येथील मुकुंदराव आंबेडकर चौक येथे उड्डाणपूल तसेच ग्रेड सेपरेटर बांधण्यासाठी 95 कोटी 21 लाख रुपयांचे टेंडर मान्य करणे, पाषाण तलावातील जलपर्णी काढण्यासाठी 93 लाख 35 हजार, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठ येथील रस्ते डांबरीकरण करणे, चर्च ते वाजंळे चौकापर्यंतचा डीपी रस्ता विकसित करणे, कै. रामचंद्र बनकर क्रीडा संकुलामध्ये विविध स्थापत्यविषयक कामे करणे.

पुणे कँटाेन्मेट विधानसभा मतदारसंघात डायसप्लॉट, भवानी पेठ, लुल्लानगर परिसरात वॉटर लाइन् टाकणे आणि दुरुस्तीविषयक कामे करण्यात येणार आहेत. हडपसर, मुंढवा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभागामध्ये टँकरने पिण्याचे पाणीपुरवठा करण्यासाठी 99 लाख 99 हजारांचे टेंडर काढण्यात आले आहे. शंकरशेठ रस्ता ते गुरुनानक नगर फूटपाथ आणि सायकल ट्रॅक विकसित करणे, नाल्यातील गाळ काढणे अशा विविध कामांचे टेंडर मान्यतेसाठी ठेवण्यात आली आहेत.

Edited By : Umesh Bambare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT