Pune News : विश्रांतवाडी चौकातील उड्डाणपूल, ग्रेडसेपरेटरच्या आराखड्यात त्रुटी

Vishrantwadi Chowk Flyover Pune News : आवश्यक ते बदल न केल्यास पूल पाडावा लागण्याची भीती विश्रांतवाडीतील नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. विश्रांतवाडी चौकातील वाहतुकीची होणारी कोंडी आणि त्यामुळे वाहनचालकांना होणारा त्रास ही बाब नित्याचीच आहे.
Vishrantwadi Chowk Flyover Map
Vishrantwadi Chowk Flyover MapSarkarnama
Published on
Updated on

Pune development News : विश्रांतवाडी भागात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने मुकुंदराव आंबेडकर चौकात उड्डाणपूल तसेच ग्रेडसेपरेटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या कामाचे अत्यंत घाईगडबडीत भूमिपूजनदेखील करण्यात आले. पालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या या प्रकल्पामध्ये असलेल्या त्रुटींचा पाढाच या भागातील माजी नगरसेवकांनी वाचला आहे.

विश्रांतवाडी चौकातील वाहतुकीची होणारी कोंडी आणि त्यामुळे वाहनचालकांना होणारा त्रास ही बाब नित्याचीच झाली आहे. या भागात सदा सर्वदा वाहतूक कोंडीचे तीन तेरा वाजलेले असतात. वाहनचालकांना या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याने मनस्ताप सहन करावा लागतो. या भागातील समस्येवर उपाययोजना करण्यासाठी स्थानिक आमदार सुनील टिंगरे हे विशेष प्रयत्नशील होते. पुणे महापालिकेकडे पाठपुरावा करत यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली होती.

आमदार टिंगरे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे मुकुंदराव आंबेडकर चौकात ग्रेडसेपरेटर आणि उड्डाणपूल हे प्रकल्प उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात अत्यंत घाईगडबडीत या कामाचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला. महापालिकेच्या स्थायी समितीत या कामाला मंजुरी देण्याचा कोणताही ठराव मान्य झालेला नसतानाही राजकीय दबावामुळे प्रस्ताव मान्य होण्यापूर्वीच या कामाचे भूमिपूजनदेखील पुणे महापालिकेने घाईगडबडीत उरकून घेतले आहे.

Vishrantwadi Chowk Flyover Map
Ravindra Dhangekar News : धंगेकरांनी आयुक्तांना कोंडीत पकडलं, थेट घराबाहेरच ठिय्या...

या भागात उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलावरून धानोरीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी सुविधा देण्यात आलेली नाही, असा आरोप या भागातील माजी नगरसेवकांनी केला आहे. महापालिकेने पुरेसे नियोजन न केल्याने भविष्यकाळात गणेश खिंड रस्त्यावरील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील पूल ज्या पद्धतीने पाडण्याची वेळ आली तशीच स्थिती या पुलाची होऊ शकते, अशी भीती या भागातील माजी नगरसेवक बॉबी टिंगरे, डॉ. सिद्धार्थ धेंडे, ऐश्वर्या जाधव तसेच भाजपचे प्रवक्ते मंगेश गोळे यांनी व्यक्त केली आहे. या उड्डाणपुलाच्या कामामध्ये आवश्यक ती सुधारणा करावी, अशी मागणी या माजी सभासदांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली असून, त्याबाबतचे पत्रदेखील त्यांना दिले आहे.

विश्रांतवाडी येथे साठे बिस्कीटकडून सर्वाधिक वाहने आळंदी रस्त्याकडे जातात. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची वाहने धानोरी-लोहगाव-चऱ्होलीकडे जातात. हा एकच रस्ता असल्याने येथे सतत वाहनांची गर्दी असते. त्यामुळे ही कोंडी सोडवण्यासाठी चौकात उड्डाणपूल किंवा भुयारी रस्ता करताना स्वतंत्र मार्ग देण्याची मागणी होती. मात्र, पालिकेकडून केवळ आळंदी रस्त्यासाठी ग्रेडसेपरेटर उभारण्यात येणार आहे, तर विमानतळाकडून आळंदीकडे जाणाऱ्या मार्गावर उड्डाणपूल केला जाणार आहे. यामुळे धानोरीकडे जाणाऱ्या वाहनांची कोंडी तशीच राहणार आहे. ही परिस्थिती अनेकदा प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतरदेखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप या माजी सभासदांनी केला आहे. या भागातील आमदार सुनील टिंगरे यांच्या प्रयत्नातून हे काम होत असले तरी आमदार टिंगरे यांना आमचा कोणताही विरोध नाही, असे माजी सभासदांनी स्पष्ट केले आहे.

'मेट्रो' साठीदेखील जागा ठेवली नाही

उड्डाणपुलाचा आराखडा तयार करताना निओ मेट्रो तसेच मेट्रोच्या आखणीनुसारच ग्रेडसेपरेटर व उड्डाणपूल उभारण्यात येत असल्याचे महापालिकेने सांगितले होते. मात्र, महामेट्रोने कोणताही आराखडा केला नसल्याचे लेखी उत्तर दिले आहे. आळंदी मार्गावर मेट्रो प्रस्तावित आहे. भविष्यात विश्रांतवाडी चौकात मेट्रो मार्ग करायचा झाल्यास त्यासाठी जागाच नाही. त्यामुळे मेट्रोसाठी हा पूल तोडावा लागण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

Edited By: Rashmi Mane

R

Vishrantwadi Chowk Flyover Map
Pune Loksabha Election 2024: पुण्यात मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर होणार लढत?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com