abvp demolished lalit kala kendra pune university  Sarkarnama
पुणे

Pune University : 'जब वी मेट' नाटकावरून राडा, 'जय श्री राम'चा नारा देत अभाविपकडून ललित कला केंद्राची तोडफोड

Abvp Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 'ललित कला केंद्रा'तर्फे 'जब वी मेट' नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन शुक्रवारी ( 2 फेब्रवारी ) सायंकाळी करण्यात आलं होतं.

Sudesh Mitkar

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ( Savitribai Phule Pune University ) सादर करण्यात आलेल्या 'जब वी मेट' नाटकावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. या नाटकाचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर समाजमाध्यमांत मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली आहे. यानंतर आक्रमक झालेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ( अभाविप ) कार्यकर्त्यांनी शनिवारी ( 3 फेब्रुवारी ) सायंकाळी 'ललित कला केंद्रा'ची ( Lalit Kala Kendra pune university ) तोडफोड केरत शाही फेक केली. यामुळे परिसरात काहीसा गोंधळ निर्माण झाला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ( Savitribai Phule Pune University ) 'ललित कला केंद्रा'तर्फे 'जब वी मेट' नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन शुक्रवारी ( 2 फेब्रवारी ) सायंकाळी करण्यात आलं होतं. नाटकात रामायणात काम करणाऱ्या कलाकारांचे व्यक्तिगत आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. नाटकामध्ये प्रभू श्री राम व सीता माता यांची भूमिका विदूषकाप्रमाणे दाखवण्यात आली. त्यामुळे 'अभाविप'च्या कार्यकर्त्यांनी हे आक्षेपार्ह नाटक बंद पाडलं.

हिंदू देवी-देवतांबद्दल अशा प्रकारची भाषा मुळीच खपवून घेतली जाणार नाही. संबंधित दोषींविरूध्द कारवाई करण्यात यावी, अशी भूमिका 'अभाविप' पुणेतर्फे घेण्यात आली आहे. या घटनेनंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला.

( राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा! )

मात्र, शनिवारी ( 3 फेब्रुवारी ) 'ललित कला केंद्रा'च्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोर्चाचं आयोजन केलं होतं. या मोर्चात थेट 'अभाविप'चे कार्यकर्ते घुसले. 'अभाविप'च्या कार्यकर्त्यांनी कलाकेंद्रात घुसत तोडफोड केली. तसेच, शाही फेक केली. यावेळी 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यात आल्या.

सहा जणांना न्यायालयीन कोठडी

'जब वी मेट' नाटकप्रकरणी 'ललित कला केंद्रा'चे प्रमुख असलेल्या डॉ. प्रविण भोळेंसह सहा विद्यार्थ्यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी सरकारी पक्षाच्या वकिलांनी पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. मात्र, ती मागणी फेटाळत न्यायालयानं सहा जणआंना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Edited By : Akshay Sabale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT