Anna Bansode Sarkarnama
पुणे

Anna Bansode News : दादांच्या गुलाबी जॅकेटनंतर आता अण्णांच्या गुलाबी फ्लेक्सची चर्चा!

NCP Anna Bansode Pink banner : दादांचे जॅकेट गुलाबी,तर त्यांचे कट्टर समर्थक अण्णांचे फ्लेक्स गुलाबी

सरकारनामा ब्यूरो

Pimpri Assembly Constituency : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निकालानंतर अचानक आपल्या पेहरावात थोडा बदल करून गुलाबी रंगाचे जॅकेट ते घालू लागले.त्यावर संमिश्र प्रतिक्रिया आल्या.त्यांच्या प्रमोशनचे काम करणाऱ्या जाहिरात कंपनीच्या सल्यावरून अजितदादा गुलाबी जॅकेट घालत असल्याचे सांगण्यात आले.त्यानंतर आता पिंपरीत लागलेल्या दोनशे गुलाबी रंगातील फ्लेक्समुळे पुन्हा गुलाबी चर्चा रंगली आहे.

दादांच्या प्रत्येक बंडात त्यांच्याबरोबर शेवटपर्यंत राहिलेले त्यांचे खंदे पाठीराखे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे(Anna Bansode) यांचे संपूर्ण मतदारसंघात हे गुलाबी फ्लेक्स लागले आहेत.आपले अण्णा, पिंपरीत पुन्हा असा लक्षवेधी मजकूर त्यावर अण्णांच्या फोटोसह आहे.उमेदवारी जवळपास नक्की झाल्याने अण्णांचे हे फलक लावल्याचे सांगण्यात आले.

जेथे ज्याचा आमदार ती जागा त्यांची या महायुतीच्या फॉर्म्यूल्यानुसार पिंपरी राष्ट्रवादीकडे(NCP) आहे. तेथे विजयी होईल असा दुसरा सक्षम उमेदवार नाही.त्यामुळे बनसोडेच पुन्हा तेथे उमेदवार असतील,हे जवळपास नक्की आहे.त्यामुळेच निवडणूक तयारी आणि प्रचाराचा भाग म्हणून हे फलक लावण्यात आले आहेत.

काही वर्षापूर्वी चिंचवड विधानसभा मतदारसंघात ‘शिवडे आय एम सॉरी!’चे ३०० बॅनर लागल्याने त्याची मोठी चर्चा झाली होती.प्रेयसी मुंबईहून पुण्याला येणार असल्याने हा प्रताप एकाने केल्याचे नंतर समजले.तर,आता त्याशेजारच्या पिंपरी मतदारसंघात गुलाबी फ्लेक्स लागल्याने चित्रविचित्र फ्लेक्सची चर्चा पुन्हा एकदा शहरात रंगली आहे.

जाहिरातीचा फंडा म्हणून प्रमोशनचे असे काही विचित्र फलक वरचेवर लागत असतात. शिवडे...नंतर‘दादा, मी प्रेग्नेंट आहे’असं मोठ्ठं होर्डिंग पुण्यात झळकलं. त्याचाही मोठा गाजावाजा झाला होता. खंडुजीबाबा चौकातील हा फलक पोलिसांनी रात्रीत का़ढून टाकला होता. ते एका नाटकाचे प्रमोशन असल्याचे नंतर समजले.त्यानंतर आता पिंपरीत निवडणुकीतील प्रमोशनचे फ्लेक्स गुलाबी रंगात झळकले आहेत.

(Edited by -Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT