Prakash Ambedkar Latest Marathi News Sarkarnama
पुणे

Prakash Ambedkar News: '' पुढील 15 दिवसांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात...''; आंबेडकरांचा खळबळजनक दावा

सरकारनामा ब्यूरो

Pune News : महाराष्ट्रातल्या राजकारणात सध्या कधी काय होईल हे सांगणं अवघड आहे. त्याचं कारण म्हणजे मागील काही दिवसांपासून अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे महाविकास आघाडीवर नाराज असून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याचदरम्यान, येत्या 15 दिवसांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात २ मोठे बॉम्बस्फोट होणार असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar)हे पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी ते बोलत होते. आंबेडकर म्हणाले, येत्या 15 दिवसानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बॉम्बस्फोट होणार आहे. आणि हा एक नसून 2 बॉम्बस्फोट होणार असल्याचा दावा प्रकार आंबेडकर यांनी केला आहे. तसेच ठाकरे गटासोबत वंचितच्या पदाधिकारी पातळीवर बैठका सुरू आहेत. आमच्या युतीची काळजी करू नका असा टोलाही विरोधकांना लगावला आहे.

राजकारणासाठी या जवानांचा बळी दिलाय का?

जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. यावर बोलताना आंबेडकर म्हणाले, पुलवामाविषयी त्यावेळीही मी बोललो होतो, जी गाडी ब्लास्ट केली. त्याला प्रोटेक्शन नव्हतं. ही माहिती मला मिळते तर सरकारलाही मिळू शकते. पण सरकारला राजकारण करायच होतं. दहा गाड्या कॅनॉव्हबद्दलची साधी बाब कॉन्स्टेबलला माहिती आहे, ती बाब यांना माहिती नसावी. यांची साधी चौकशी सुद्धा नाही. पॉलिटिकल राजकारणासाठी या जवानांचा बळी दिलाय का? असा सवालही उपस्थित केला जात असल्याचं आंबेडकर म्हणाले आहेत.

राऊतांच्या 'रोखठोक' दाव्यानं तर्कवितर्कांना उधाण...

ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक सदरात पवार आणि ठाकरे भेटीवर भाष्य केलं आहे. राऊत म्हणतात, एकनाथ शिंदे यांनाही तुरुंगात जायचे नव्हते. म्हणून त्यांनी भाजपचा मार्ग स्वीकारला. ते सरळ बेईमानांचे सरदार झाले. मंगळवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शरद पवारांना भेटलो.

यावेळी पवार म्हणाले, कोणालाही मनापासून सोडून जायचे नाही, पण कुटुंबाला टार्गेट केले जात आहे. कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न, पण 'पक्ष' म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही. महाराष्ट्रातील लोकांत सध्याच्या सरकारबद्दल कमालीचा संताप आहे. जे आता भाजपबरोबर जातील ते राजकीय आत्महत्या करतील असे पवार-ठाकरे यांचे मत पडले.

वज्रमूठ सभेआधीच अजित पवारांचं 'ते' विधान वक्तव्य

अजित पवार( Ajit Pawar) यांनी राज्यातील सत्तासंघर्ष आणि १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत मोठं विधान केलं आहे. पवार म्हणाले, जरी 16 आमदार अपात्र झाले तरी देखील राज्यातील शिंदे फडणवीस सरकार कोसळणार नाही. सरकार स्थिर राहील असा अप्रत्यक्ष दावाच त्यांनी केला आहे.

यावेळी बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की, अपक्ष धरून भाजपकडे 115 आमदार आहेत. 106 त्यांचे आणि नऊ अपक्ष. एकनाथ शिंदेसोबत गेलेले 40 आमदार, 10 अपक्ष आमदार थोड्यावेळ बाजूला ठेवले तरी दोघं मिळून 155 आणि 10 अपक्ष असे 165 आमदार सध्या सरकारकडे आहेत. त्यामळे जरी 16 आमदार अपात्र झाले तरी देखील सरकारकडे बहुमताचा आकडा कायम राहणार असल्याचं पवार यांनी यावेळी सांगितलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT