Supriya Sule News : गुलाबराव पाटलांना सुप्रिया सुळेंचा टोला; म्हणाल्या, "ते कुठल्या पक्षाचे..."

Gulabrao Patil : शिंदे-भाजप सरकारमधील नेत्यांच्या वक्तव्यांनी चर्चांना उधाण
Gulabrao Patil, Supriya Sule
Gulabrao Patil, Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : शिंदे गटाचे नेते व मंत्री गुलाबराव पाटील हे त्यांच्या रोखठोक व हटके वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या भाजप शिवसेना युतीत येणार असल्याच्या चर्चांवर मोठं विधान केलं आहे.

पाटील म्हणाले, "अजित पवार हीच राष्ट्रवादी आहे. त्यामुळे ते जे बोलतील तोच आमदारांचा आकडा त्यांच्यासोबत असेल. अजित पवारांसोबत बरेच आमदार असून कोणतेही लग्न व्हायचं असेल तर तिथीची गरज असते. "

दरम्यान, संजय राऊत यांनीही राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपचा डाव असल्याचे विधान केले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याची चर्चा सुरू झाली आहे.

Gulabrao Patil, Supriya Sule
Gulabrao Patil News : शिंदे गटाच्या मनात चाललंय काय? शिवतारेंनंतर गुलाबरावांचंही अजितदादांविषयी मोठं विधान

या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे कुठल्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. ते एखाद्या पक्षाचे अध्यक्ष असतील तर मला माहीत नाही. माझे जनरल नॉलेज कमी असेल. मी अजितदादांशी विविध कामांसाठी दररोज बोलतेय. आज मी मतदार संघात काम करण्यासाठी आले आहे. गॉसिप करण्यासाठी नाही. त्यासाठी मला वेळ नाही."

Gulabrao Patil, Supriya Sule
Mahavikas Aghadi : 'वज्रमूठ सभे'त तेजस ठाकरे उपस्थित राहणार?

दरम्यान, गुलाबराव पाटील यांनी महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अजित पवार आपल्या १५ आमदारांना घेऊन भाजपमध्ये जाणार आहेत. त्यामुळे नागपूरमध्येही महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार असून ही सभा वज्रमूठ आहे की फुटलेली मूठ हे दिसेल अशी टीका मंत्री गुलाबराव पाटलांनी केली आहे. गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्यावर मात्र विरोध पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या मिश्किल भाषेत उत्तर दिले आहे.

Gulabrao Patil, Supriya Sule
Ajit Pawar On Government : शिंदे-फडणवीस सरकार पडणार नाही : अजितदादांचा मोठा दावा; विधानसभेतील संख्याबळाचेही मांडले गणित

अजित पवार म्हणाले की, "सर्व नेत्यांचे प्रेम माझ्यावरच का उतू जातेय, हेच मला कळत नाही. गुलाबराव पाटील, दादाजी भुसे (Dada Bhuse), उदय सामंत (Uday Samant) हे आधी बोललेत. या सगळ्यांचा माझ्याबद्दलचे प्रेम का उतू जाताय हे कळायला मार्ग नाही. माझ्या बाबतची भूमिका मी मांडली आहे. या सभेला अजित पवार येणार की नाही, भाषण करणार की नाही, कुठे बसणार या चर्चा माध्यमांवर सुरू आहे. पण आमचे हे सगळे आधीच ठरलेले आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com