Rohit Pawar-Jay Pawar
Rohit Pawar-Jay Pawar Sarkarnama
पुणे

Pawar's Daund Tour : पवारांचे दौंडकडे विशेष लक्ष; काल रोहित पवारांचा, तर आज जय पवारांचा दौरा

Vijaykumar Dudhale

Pune, 26 April : पवार विरुद्ध पवार लढतीमुळे बारामती लोकसभा मतदारसंघ सध्या देशभरात चर्चेत आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष बारामती मतदारसंघातील राजकीय घडामोडींकडे असते. महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी अख्खं पवार कुटुंबीय प्रचारात उतरलं आहे. विशेषतः आमदार रोहित पवार हे पायाला भिंगरी लावून बारामतीत फिरत आहेत. महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी त्यांचे सुपुत्र जय पवारही प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. पवार घराण्यातील दोन नातवांनी दौंड तालुक्यात विशेष लक्ष घातले असून मतदारांच्या भेटीगाठींवर त्यांचा विशेष भर आहे.

सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या प्रचारासाठी आमदार राेहित पवार (Rohit Pawar) यांनी संपूर्ण दिवस दौंड तालुक्यासाठी दिला. आमदार पवार यांनी गुरुवारी (ता. 25एप्रिल) सकाळी बोरीभडक-चंदनवाडी येथून आपल्या प्रचार दौऱ्याला सुरुवात केली. रोहित पवारांनी काही ठिकाणी घोंगडी बैठकाही घेतल्या. खामगाव, पारगाव बैठक घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय जेधे यांच्या संपर्क कार्यालयाचे पारगाव येथे उद्‌घाटन केले. त्यानंतर वकिलांचा मेळावा दौंड शहरात घेतला आणि वरवंड येथे दौऱ्याची सांगता सभा घेतली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी आज (ता. 26 एप्रिल) आईच्या प्रचारासाठी दौंड तालुक्याचा दौरा केला. दौंड तालुक्यातील सहजपूर-जावजीबुवाची वाडी येथून जय पवार यांनी प्रचाराला सुरुवात केली. त्यानंतर खामगाव, खुटबाव, यवत, भांडगाव, वरवंड, पाटस, कुरकुंभ येथे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. दौंड शहरात पदयात्रा काढून जय पवार यांनी आपल्या दौऱ्याची सांगता केली.

सुनंदा पवार यांनी आपल्या मुलीसोबत सुप्रिया सुळे यांच्यासाठी गावभेट दौरा केला आहे. तसेच येत्या काही दिवसांत युगेंद्र पवार हेही सुळे यांच्या प्रचारासाठी दौंडमध्ये येणार आहेत. सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांचे मामेभाऊ जगदीश कदम, शैलेंद्र कदम व‌ प्रदीप कदम हे गावोगावी बैठका घेऊन प्रचार करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT