Rohit Pawar News : आता ज्युनिअर पवार काका-पुतण्या संघर्ष पेटला; रोहित पवारांचे अजितदादांना ओपन चॅलेंज!

Lok Sabha Election 2024 : राज्यात कोयता गँग आणि गोळीबारामुळे जनता त्रस्त असताना तेथे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काही करत नाहीत आणि नेते तसेच त्यांच्या मुलांना सिक्युरिटी देतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
Rohit Pawar News
Rohit Pawar News Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पार्थ पवारांचा 2019 च्या लोकसभेला झालेल्या पराभवाचा बदला या वेळी मावळमध्ये महायुतीच्या श्रीरंग बारणेंचा पराभव करून घेणार असल्याचे शरद पवार राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी मंगळवारी (ता.23) पिंपरी-चिंचवडमध्ये सांगितले. त्याचवेळी त्यांनी पार्थ यांना देण्यात आलेल्या वाय प्लस सुरक्षा व्यवस्थेवर बोट ठेवले. खरं तर त्यांना मोदींसारखी झेड सुरक्षा द्यायला पाहिजे होती,अशी बोचरी टीका त्यांनी केली. (Lok Sabha Election 2024)

मावळमधील आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांच्या प्रचार सभेसाठी रोहित हे आकुर्डीत आले होते. त्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पार्थ यांना वाय प्लस काय मोदींसारख्या झेड प्लस सिक्युरिटी आणि पुढेमागे दोन रणगाडे द्यायला पाहिजे होते, असा टोला मारला. राज्यात कोयता गँग आणि गोळीबारामुळे जनता त्रस्त असताना तेथे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काही करत नाहीत आणि नेते आणि त्यांच्या मुलांना सिक्युरिटी देतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आपले साम्राज्य टिकवून आपल्याविरुद्ध कारवाई टाळण्यासाठी अजितदादा महायुतीत गेल्याचा दावा रोहित यांनी या वेळी केला. त्यांना मुलाचा पराभव करणाऱ्या श्रीरंग बारणेंचा प्रचार करण्यासाठी यावे लागतंय, यावरून त्यांची काय परिस्थिती झाली आहे, याची कल्पना येते, असे ते म्हणाले. शंभर टक्के खोटे बोलणाऱ्या भाजपशी संगत केल्याने अजितदादा आताच पन्नास टक्के खोटं बोलू लागले असून, लवकरच ते शंभर टक्के तसं बोलतील, असा टोला रोहित पवारांनी (Rohit Pawar) मारला.

Rohit Pawar News
Rohit Pawar News : पार्थ पवारांच्या मागे-पुढे दोन रणगाडे द्यावेत; रोहित पवार नेमके काय म्हणाले?
Rohit Pawar News
NCP Manifesto : अजित पवारांनी जाहीरनाम्यातून सांगितली राष्ट्रवादी काँग्रेसची 'पंचसूत्री'!

अजितदादांनी (Ajit Pawar) काही गोष्टी समोर आणल्या, तर रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांचं महाराष्ट्रात फिरणं अवघड होईल, असे वक्तव्य अजित पवार समर्थक मावळचे आमदार सुनील शेळके यांनी काल केले होते. त्यावर बोलताना रोहित यांनी अजितदादांसह शेळकेंनाही खुले आव्हान दिले. अजिदादांत दम असेल, तर त्यांनी एक पत्रकार परिषद घ्यावी, तेथे मी व त्यांनी एकमेकांबद्दल बोलावे, असे आव्हान रोहित यांनी दिले. त्यात दादा माझ्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतील का? अशी शंका त्यांनी व्यक्त केली.आपल्याला दिलेलं चॅलेंज स्वीकारले असून आता मी देत आहे, असे सांगत तुमच्या नेत्यांत (अजितदादा) ते स्वीकारण्याचा आत्मविश्वास आहे का? असं आव्हान रोहित यांनी आ. शेळकेंना आता दिले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com