Ajit Pawar-Harshvardhan Patil
Ajit Pawar-Harshvardhan Patil  Sarkarnama
पुणे

Ajit Pawar-Harshvardhan Patil : भाजपच्या मेळाव्यानंतर अजितदादा-हर्षवर्धन पाटील यांच्यात डिनर डिप्लोमसी!

संतोष आटोळे

Indapur, 18 April : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी सहकारमंत्री तथा भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्यातील सख्य संपूर्ण पुणे जिल्ह्याला माहिती आहे. मात्र, बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्याने पवारांनी सर्वांशी जुळवून घेतले आहे. आता तब्बल पाच वर्षांनंतर हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. एवढेच नाही तर अजितदादा हे सुनेत्रा पवारांसह हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी स्नेह भोजनाला जाणार आहेत.

इंदापूर येथे शुक्रवारी (ता. १९ एप्रिल) सायंकाळी भाजप (BJP) पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री पवार आणि हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) हे संबोधित करणार आहेत. या मेळाव्यास बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारही (Sunetra Pawar) उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि सुनेत्रा पवार हे पाटील यांच्या निवासस्थानी स्नेह भोजनाला जाणार आहेत. त्या ठिकाणी निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हर्षवर्धन पाटील यांनी मागील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान इंदापूर मतदारसंघ काँग्रेसला सुटत नसल्याने अजित पवार यांच्यावर हल्लोबल करत काँग्रेसमधून भाजपत प्रवेश केला होता. तसेच, लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतरही हर्षवर्धन पाटील यांच्या मुलांनी आम्हाला विधानसभेला कोणी मदत करेल, त्यांचेच काम आम्ही करणार, आमचा विश्वासघात झाला आहे, असे म्हणत सुनेत्रा पवार यांचे काम करण्याबाबत नकारघंटा दर्शविली होती. मात्र, महायुतीच्या नेत्यांनी समजूत काढल्यानंतर हर्षवर्धन पाटील हे पवार यांचे काम करण्यास तयार झाले आहेत.

भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्र कधी येणार

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर येथे 25 मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. त्यानंतर दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 एप्रिल रोजी भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. त्यानंतर 17 एप्रिल रोजी अजितदादांनी इंदापूर येथे डॉक्टर, व्यापारी, वकील यांची बैठक घेतली. त्या बैठकीलाही हर्षवर्धन पाटील अनुपस्थित होते. पुण्यात आज अर्ज भरताना भरणे आणि पाटील एकत्र आले होते. मात्र, इंदापूरमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपचे नेते आणि कार्यकर्ते एकत्र कधी येणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT