Harshvardhan Patil News : अजितदादांच्या बैठकीनंतर अन् फडणवीसांच्या इंदापूर दौऱ्याआधी..., हर्षवर्धन पाटील काय म्हणाले

Loksabha Election 2024 : हर्षवर्धन पाटील म्हणाले भाजप लढेल असे वाटत होते. त्या दृष्टीने तयारी करत होतो. मात्र, आता समीकरणे बदलली आहेत. आम्ही महायुतीचे काम सगळ्यांनी करायचे आहे. पण महायुतीचे पथ्य सगळ्यांनी पाळले पाहिजे.
Harshvardhan Patil
Harshvardhan PatilSarkarnama
Published on
Updated on

Baramati Lok Sabha Constituency : बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी अजित पवारांनी आपल्या राजकीय विरोधकांशी हातमिळवणी केली आहे. आधी विजय शिवतारे यांनी माघार घेतली. त्यानंतर अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर हर्षवर्धन पाटील Harshvardhan Patil देखील काहीसे मवाळ झाले होते. मात्र, हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीस उद्या (शुक्रवारी) इंदापूर दौऱ्यावर येण्याच्या आधी राष्ट्रवादीविरोधात मोठे वक्तव्य केले आहे.

आमचा आणि राष्ट्रवादीचा (NCP) 20 वर्षांचा संघर्ष आहे. मात्र, आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. मात्र, ज्यांच्यासाठी आम्ही करतो आहोत त्यांनी आमच्यासाठी भविष्यात काम करावं लागेल ना. हे साहजिकच आहे, असे अजित पवारांचे नाव न घेता हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी सुनावले. हर्षवर्धन पाटील म्हणाले, भाजप लढेल असे वाटत होते. त्या दृष्टीने तयारी करत होतो. मात्र, आता समीकरणे बदलली आहेत.

Harshvardhan Patil
Dharashiv Lok Sabha News : तब्बल 28 वर्षांनंतर इतिहास बदलला; उमेदवार शिवसेनेचा पण लढणार धनुष्यबाणाविना

आम्ही महायुतीचे काम सगळ्यांनी करायचे आहे. पण महायुतीचे पथ्य सगळ्यांनी पाळले पाहिजे. आमचे काही प्रश्न आहे ते आमचे कार्यकर्ते मांडतील. आज आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय हा अन्याय आमच्याच महायुतीतील मित्रपक्ष करीत आहेत, पण देवेंद्र फडणवीस यांनी पालकत्व घेतले आहे. भविष्यात प्रश्न उद्भवतील त्यावर देवेंद्र फडणवीस मार्ग काढतील.

विधानसभेच्या जागेवरून हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये संघर्ष होईल, अशी चर्चा आहे. मात्र, आता विधानसभा निवडणुकीच्या बाबत चर्चा झाली नाही. आता लोकसभेची चर्चा आहे. त्यामुळे लोकसभेच्या पाठिंब्याच्या बदल्यात विधानसभेच्या मागणीवर हर्षवर्धन पाटील यांनी भाष्य करण्याचे टाळले.

R

Harshvardhan Patil
Loksabha Election 2024 : शशिकांत शिंदे पवारांच्या भेटीला; साताऱ्याचा आज फैसला..?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com