Ajit Pawar, Supriya Sule Sarkarnama
पुणे

Pawar Family Diwali : दिवाळीच्या प्रकाशात पवार कुटुंबातील राजकीय मतभेद दूर; दरवर्षीप्रमाणेच यंदाही भाऊबीज जोमात

Supriya Sule And Ajit Pawar : साडीबद्दल सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचे मानले आभार

Sunil Balasaheb Dhumal

रवीकिरण सासवाडे

Baramati Political News : काटेवाडी येथे पवार कुटुंबीयांचा भाऊबीज कार्यक्रम उत्साहात पार पडला. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह सर्व बहिणींनी औक्षण केले, तर सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या साडीबद्दल सुप्रिया सुळे यांनी समाजमाध्यमावर आभार मानले. (Latest Political News)

दिवाळी पाडव्यानिमित्त मंगळवारी उशिरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोविंदबागेत हजेरी लावली होती, तर बुधवारी भाऊबीजनिमित्त ज्येष्ठ नेते शरद पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी दाखल झाले होते. राजकीयदृष्ट्या मतभेद झाले तरी दिवाळी सणाला पवार कुटुंब एकत्र आले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिलाच दिवाळी उत्सव साजरा होत आहे. बारामती येथे मंगळवारी व्यापारी असोसिएशनच्या बैठकीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला. पक्षीय फूट व अजित पवार गटाबाबत त्यांनी कोणतेही वक्तव्य केले नाही. या दिवाळी उत्सवाच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील थेट माध्यमांसमोर येणे टाळले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळी राजकीय भूमिका घेतल्यानंतर यंदा प्रथमच पवार कुटुंबीयांची दिवाळी बारामतीत नेहमीच्याच उत्साहाने साजरी केली. यानिमित्त पवार कुटुंबियांनी राजकारण व कुटुंब या दोन बाबी वेगळ्या असल्याचा संदेशच महाराष्ट्राला दिला.

दरम्यान, भाऊबीजनिमित्ताने खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह सर्व बहिणींनी अजित पवार यांच्यापाठोपाठ त्यांचे बंधू श्रीनिवास पवार, उद्योजक रणजीत पवार, जयंत पवार यांना सर्व बहिणींनी मिळून औक्षण केले. यानंतर सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या साडीबद्दल सुप्रिया सुळे यांनी समाजमाध्यमावर आभार मानले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT