Ajit Pawar News : Sarkarnama
पुणे

Ajit Pawar News : अजितदादा जेव्हा आपल्याच स्टाईलने आयुक्ताचेही कान टोचतात...

Uttam Kute

PImpri Chinchwad News : पिंपरी–चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फैलावर घेतले. पोलिस आयुक्तांना पवारांनी खडेबोल सुनावले आहेत. यामुळे अजित पवार यांच्या या स्टाईवची शहरात दिवसभर चर्चा होती. (Latest Marathi News)

टीडीआर प्रकरणामुळे गोत्यात आलेले शेखरसिंह हे भेटत नसल्याचे तसेच त्यांचे अधिकारीही नागरी प्रश्नी योग्य ते उत्तर देत नसल्याची तक्रार मिडीयाच्या प्रतिनिधींनी सकाळी उद्योगनगरीत आलेल्या अजित पवारांकडे केली. त्यावर महापालिकेची मुदत संपल्याने पदाधिकाऱ्यांअभावी ही समस्या उदभवली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. तरीही आयुक्त शेखरसिंहांना सांगतो, असे त्यांनी सांगितले. त्यावर लगेच दुपारी आयुक्तांनी पालिकाभवनात पत्रकारपरिषद घेतली.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदी व्हीयआयपी भेटींच्या वेळी त्यांच्याशी संवाद साधण्यात शहर पोलिस अडथळा आणतात, या मिडियाच्या दुसऱ्या आयुक्तांच्या (सीपी) तक्रारीवरही अजित पवारांनी आपल्या स्टाईलने एक घाव दोन तुकडे करीत तोडगा काढला. चौबेजी असे म्हणत त्यांनी सीपींना मीडियासमोर बोलावले. तुम्ही त्यांना अडवू नका, त्यांच्याशी बोलायचे की नाही, ते आम्ही ठरवू, असे सांगितले. त्याचवेळी 'झेड प्लस' सुरक्षा असल्याने ते आमची काळजी घेत असतात, असेही सांगण्यास ते विसरले नाहीत.

आडम मास्टरांच्या सोलापूरच्या धर्तीवर उद्योगनगरीतही कामगारांसाठी मेगा हौसिंग प्रकल्प होऊ शकतो -

राज्यातील नागरिकांना हक्काचे,चांगले घर मिळावे,झोपडपट्टी विरहीत शहर असावे आणि राज्यातील प्रत्येक गरीबाला हक्काचे घर मिळावे हे शासनाचे स्वप्न आहे,असे पालकमंत्र्यांनी घराच्या सोडतीच्या कार्यक्रमात सांगितले.जागा मिळाल्यास कामगारांसाठी सोलापूरच्या धर्तीवर गृहसंकुल उभारण्याचा प्रयत्न करता येईल, कारण गरजूला घर मिळाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद मनाला समाधान देणारा आहे, असे ते म्हणाले.सोडतीनंतर पात्र लाभार्थ्यांना घराचा ताबा कधी मिळणार हे त्वरीत कळवावे, त्यासाठी उशिर लावू नये,हे आपल्या बारकाव्याच्या स्टाईलने सांगण्यास ते विसरले नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT