Pune News : बारामती लोकसभा मतदारसंघात काल मतदान पार पडले. मतदान प्रक्रियेदरम्यान अनेक गैरप्रकार घडले असल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाला प्राप्त झाले आहेत. मतदारसंघातून तब्बल 48 तक्रारी निवडणूक आयोगाला प्राप्त झाल्या असून सर्वाधिक बारामती विधानसभा मतदारसंघातून 23 तक्रारी करण्यात आले आहेत. यापूर्वी देखील अजित पवारांनी केलेल्या विधानाबाबत महाविकास आघाडीकडून निवडणूक आयोगाकडे तक्रारी करण्यात आले आहेत. याबाबत अजित पवार यांनी सभेदरम्यान वक्तव्य केले असून, या नोटिशीला उत्तर देताना मी थकून गेलो असल्याचं भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
बारामतीनंतर आता शिरूरमध्ये अजित पवारांनी मॅरेथॉन सभा घेण्यास सुरुवात केलेली आहे. सकाळी घोडेगाव येथे झालेल्या सभेनंतर आता लगेचच अजित पवार यांनी टाकली हजी येथे सभा घेतली.अजित पवार म्हणाले, "शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये मागील वेळी आपण सर्वांनी मिळून आढळराव पाटलांना पाडलं होतं. मात्र यंदा आपण सर्वांनी मिळून त्यांना निवडून आणायचं आहे. मागील पाच वर्षांत खासदाराचं काम पाहिल्यास आढळराव पाटलांनी दहा वर्षात केलेलं काम चांगली आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा खासदार होण्याची संधी देणे आवश्यक असल्याचं, अजित पवार म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अजित पवार म्हणाले, शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये मागील पाच वर्षांमध्ये केंद्रातून येणारा निधी थांबला आहे. तो निधी आणून विकास साधण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला विजयी करायचे आहे. नगर लोकसभा मतदारसंघामध्ये पारनेर येथे सुजय विखे पाटील हे कमळ चिन्हावर निवडणूक लढत असून ते महायुतीचे उमेदवार आहेत. तिथे निलेश लंके हे महाविकास आघाडीकडून निवडणूक रिंगणात आहे. त्या नीलेश लंके (Nilesh Lanke) यांना मीच पक्षामध्ये आणलं. शरद पवार साहेबांना तो काळा का गोरा हे माहिती पण नव्हतं. मी त्याला तिकीट देऊन निवडून आणलं. त्याच्या मतदारसंघांमध्ये भरघोस असा निधी दिला. मात्र जेव्हा गरज होती तेव्हा ते तिकडे गेले. एकदा निष्ठा ठेवली म्हणजे निष्ठेनेचच राहिला पाहिजे. आम्ही जर विकास निधी नाही दिला तर बोला, असं म्हणत अजित पवार यांनी निलेश लंकेंना सुनावलं.
अजित पवार (Ajit Pawar) पुढे म्हणाले, "रांजणगाव परिसरामध्ये काही वेडेवाकडे प्रकार घडत आहेत. आचारसंहिता होऊ द्या, मग आपण त्यांच्याकडे बघू. पण आता जास्त काही बोलणार नाही, कारण बोललो तर लगेच नोटीस द्यायला तयार असतात. आतापर्यंत फार मोठ्या नोटिस आल्या आहेत. त्यांना उत्तर देता देतात मी थकून गेलो आहे, असं पवार म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.