Ajit Pawar News  Sarkarnama
पुणे

Ajit Pawar News : भाजपसह-शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची 'गुरुजी' अजितदादा घेणार 'शाळा'...

Pune NCP News : पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे मनोमिलन करण्यासाठी महायुतीचा रविवारी मेळावा..

Chaitanya Machale

Pune News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे मनोमिलन करण्याचा निर्धार महायुतीत सहभागी झालेल्या पक्षांनी केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजप, शिवसेना (शिंदे गट ) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आरपीआय (ए) शिव संग्राम आणि मित्र पक्षांचा पुणे जिल्ह्याचा पहिला संयुक्त मेळावा येत्या रविवारी 14 जानेवारीला होणार आहे. विशेष म्हणजे या मेळाव्याला जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मार्गदर्शन करणार आहेत. (Latest Marathi News)

पुण्यातील डी पी रस्त्यावरील शुभारंभ मंगल कार्यालयात हा मेळावा होणार आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. राज्यातील सर्व 38 जिल्ह्यांमध्ये संयुक्त मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार हा मेळावा होणार आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे मार्गदर्शन या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना मिळणार आहे.

लोकसभा निवडणुकीचे कामाचे व्यवस्थापन करणे, मोदी सरकारच्या लोकोपयोगी योजना, देशातील महायुती सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविणे तसेच पुणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांची संवाद साधणे आणि विविध प्रकल्प व विकास कामांची माहिती नागरिकांना देणे, अशा प्रकारचे नियोजन मेळाव्यात करण्यात आले आहे.

घटक पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये समन्वयाने काम व्हावे हाही मेळाव्याचा उद्देश आहे. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, संदीप खर्डेकर, आरपीआचे परशुराम वाडेकर, मंदार जोशी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर, सुरेश घुले, प्रदीप गारटकर, शिवसेना शिंदे गटाचे नाना भानगिरे, किरण साळी आदी उपस्थित होते.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT