Pune, 15 February : महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात ‘कोल्ड वॉर’ सुरू असल्याची चर्चा राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र, त्यावर आता खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच स्पष्टीकरण दिले आहे. फडणवीस आणि शिंदे यांच्यात ‘कोल्ड वॉर’ असल्याची चर्चा ही धांदात खोटी आहे, असा दावा अजितदादांनी केला आहे.
पुण्यात पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या शिंदे-फडणवीस यांच्या कथित वादावर भाष्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यात कसलंही वॉर नाही. तुम्हाला बातम्या नसल्या की तुम्ही अशा बातम्या चालवत असता, असे सांगून त्याबाबतचे खापर अजित पवारांनी माध्यमांवर फोडले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मला हलक्यात घेऊ नका, असे विधान केले होते. ते भाजप नेत्याला असल्याची चर्चा रंगली होती. त्यावरही अजित पवार यांनी भाष्य केले आहे, ते म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये बोलताना दिलेला इशारा हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रमुखांना दिला आहे, असाही दावा अजित पवार यांनी केला आहे.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्या भेटीवरून राज्यात मोठे वादंग उभे राहिले आहे. सुरेश धस यांच्यावर राज्यभरातून विशेषतः विरोधी पक्षाच्या लोकांकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. पण त्या भेटीचे अजित पवार (Ajit Pawar) यांनी समर्थन केले आहे. ते म्हणाले सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीत गैर काय आहे. धनंजय मुंडे मंत्री आहेत आणि सुरेश धस आमदार आहेत. आजारी असल्याने माणुसकीच्या नात्याने भेट घेण्यात गैर नाही.
सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवर देशमुख कुटुंबीयांच्या ज्या काही भावना आहेत, त्याही योग्य आहेत, अशी कबुलीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बोलून दाखवली.
अभिनेते राहुल सोलापूरकर हे प्राथमिक दर्शनी दोषी नाहीत. मात्र, अजून तपास सुरू आहे, त्यातून जे निष्पन्न होईल, त्यानुसार कारवाई होईल. लव जिहाद विरोधी कायद्या संदर्भात समितीचा अहवाल तर येऊ द्या. त्याबाबत तुम्हाला एव्हढी घाई का झालीय, असा सवाल अजित पवार यांनी विचारला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.