Nana Patole-Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Ajit Pawar : नाना पटोलेंच्या मतदानवाढीच्या आरोपाला अजितदादांचे खास शैलीत उत्तर; ‘अहो पटोलेसाहेब तो मतदारराजा हाय ...’

Assembly Election 2024 Result : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मी अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन बसलो होतो. राज्यातील जनतेला काही थेट लाभ देता येईल का, याची मी चाचपणी केली.

Vijaykumar Dudhale

Pune, 30 November : अहो नाना पटोलेसाहेब...साडेचार, पाचच्या पुढं लोक मतदान केंद्रांवरील रांगेत आले. त्यात आमचा काय दोष आहे. मतदारांनी कधी रांगेत यायचं आणि कधी मतदान करायचं, यासाठी जबरदस्ती करू शकत नाही. मी विनंती करत होतो. मात्र, लोकांनी सायंकाळी रांगा लावल्या, तो मतदारराजा आहे, त्याला पाहिजे त्याचवेळी तो मतदानाला येणार आहे, अशा शब्दांत अजित पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सुनावले.

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव (Baba Adhav) यांनी निवडणुकीतील गैरप्रकारच्या मुद्यावर गेली तीन दिवसांपासून आत्मक्लेष आंदोलन सुरू केले आहे. अजित पवार यांनी त्यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी महायुतीची भूमिका मांडली. त्या वेळी बोलताना त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संध्याकाळी मतदान वाढल्याचा आरोपाला अजित पवार यांनी उत्तर दिले.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, मतदार हे साडेचार, पाचच्या पुढं मतदान केंद्रांवरील रांगेत आले. त्यांना आतमध्ये गेल्यानंतर...माझ्या तिथं बारामतीत सकाळी सात ने नऊ या दोन तासांत अवघे सात टक्के मतदान झाले होते. सायंकाळी पाच ते मतदान संपेपर्यंत मतदानाची टक्केवारी पंधरा टक्के होती. त्यात आमचा काय दोष आहे.

मतदारांनी कधी रांगेत यायचं आणि कधी मतदान करायचं. आम्ही विनंती करत होतो. मीही बूथवर फिरत होतो. सगळ्यांना मतदानासाठी चला असे आवाहन करत होतो. काहीजण रांगा कमी होऊ द्या. थांबा दुपारच्या वेळी येतो, असे सांगत होते. तो मतदारराजा आहे, तो त्याला पाहिजे, त्याचवेळी मतदानाला येणार आहे. आपण काय जबरदस्ती करू शकत नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

निवडणुकीत पैशाचा वारेमाप वापर झाला आहे, यावर स्पष्टीकरण करताना अजित पवार म्हणाले, आपल्याकडे व्हिडिओ शुटिंगची सुविधा होती, तंत्रज्ञानाची साधने आहेत. त्या गोष्टी रोखण्यासाठी आपल्याकडे यंत्रणा आहेत. आपल्याकडे बूथ कप्चरिंग असे प्रकार घडलेले नाहीत. राज्यातील जनतेने कौल दिला आहे.

प्रलोभनं दाखवलं म्हणतात. पण, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मी अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन बसलो होतो. राज्यातील जनतेला काही थेट लाभ देता येईल का, याची मी चाचपणी केली. माझं साडेसहा लाख कोटींचं बजेट होतं. त्यातील ७५ हजार कोटी बाजूला काढा. ४५ हजार कोटी रुपये लाडक्या बहिणीला द्यायचे आहेत. पंधरा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या कृषिपंपांच्या विजबिल माफीसाठी द्यायचे आहेत, असे मी अधिकाऱ्यांना सांगितले होते, असेही अजितदादांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT