Amol Kolhe, Ashok Pawar Sarkarnama
पुणे

Sharad Pawar Vs Ajit Pawar : खासदार कोल्हेंसह राष्ट्रवादीच्या पाच आमदारांचे तळ्यात-मळ्यात ? आयोगाच्या निकालावर चर्चा

Amol Kolhe, Ashok Pawar : राष्ट्रवादी फुटीनंतर अनेक आमदारांसह पदाधिकऱ्यांनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली होती.

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिले आहे. विधिमंडळातील संख्याबळ पाहून आयोगाने हा निर्णय दिल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, एक खासदार आणि पाच आमदारांचे प्रतिज्ञापत्र दोन्ही गटांकडे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बहुतांश जणांनी आपली भूमिका स्पष्ट करत अजित पवार (Ajit Pawar) किंवा शरद पवार गोटात सहभागी झाले. मात्र, काही आमदार, खासदारांना स्पष्टपणे भूमिका घेणे जड गेले होते. आता दोन्ही बाजूला प्रतिज्ञापत्र देणाऱ्या राष्ट्रवादीच्या पाच आमदारांची आणि एका खासदाराचे नाव समोर आले आहे. यातून या आमदारांची भूमिका अद्यापही तळ्यात मळ्यात आहे की काय, अशी चर्चा आहे.

खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यासह आमदार चेतन तुपे, किरण लहामटे, राजेंद्र शिंगणे, मानसिंग नाईक आणि अशोक पवार यांचे प्रतिज्ञापत्र अजित पवार आणि शरद पवार गटाकडे आहेत. आमदार अशोक पवार आणि खासदार अमोल कोल्हेंनी सुरुवातीला अजित पवार गटाला प्रतिज्ञापत्र दिले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा शरद पवार गटाला काउंटर प्रतिज्ञापत्र दिल्याची माहिती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या प्रकारावर काउंटर प्रतिज्ञापत्रात खासदार कोल्हे आणि आमदार अशोक पवारांनी (Ashok Pawar) आपले मत स्पष्ट केले आहे. अजित पवार गटाने आमच्याकडून दिशाभूल करून प्रतिज्ञापत्र घेतल्याचा आरोपच अशोक पवार आणि अमोल कोल्हेंनी केला आहे. आम्हाला हे प्रतिज्ञापत्र शरद पवार यांच्या आदेशाने घेतले जात असल्याची माहिती सुरुवातीला सांगण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र अजित पवार गटाने आमची दिशाभूल केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT