Pune Market Commitee Election : APMC Pune :
Pune Market Commitee Election : APMC Pune :  Sarkarnama
पुणे

APMC Pune : पुणे बाजार समितीचा निकाल शनिवारी सकाळी; राष्ट्रवादीच्या पॅनलसमोर भाजपाचा टिकाव लागणार?

सरकारनामा ब्यूरो

APMC Pune News : राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज राज्यभरात मतदान पार पडले. पुणे जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीतही मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे. पुणे बाजार समितीसाठी ७२ टक्के इतके मतदान, तर ग्रामपंचायत मतदारसंघात ९६ टक्के एवढे विक्रमी मतदान झाले आहे. उद्या शनिवार दि. २९ एप्रिल रोजी रोजी मतमोजणीला सुरूवात होऊन निकाल जाहीर होणार आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) पुणे जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावली आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीची ताकद लक्षणीय असली तरी, भाजपनेही ही लढाई अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते विकास दांगट हे भाजपचे (BJP) प्रदीप कंद यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय पॅनेलमधून उभे आहेत. रोहिदास उंद्रे, शुक्राचार्य वांजळे, दिलीप काळभोर, प्रकाश जगताप या उमेदवारांनी सर्वपक्षीय पॅनेलमधून राष्ट्रवादीसमोर आव्हान निर्माण केले आहे. एकप्रकारे राष्ट्रवादीला राष्ट्रवादीचेच आव्हान, असेच चित्र असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (हवेली) पंचवार्षिक निवडणुकीत पीडीसीसी बँकेचे संचालक विकास दांगट यांची राष्ट्रवादीतून हाकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर (Pradeep Garatkar) यांनी दिली होती.

विकास दांगट यांनी पक्षविरोधी भूमिका घेऊन राष्ट्रवादीच्या अधिकृत पॅनलच्या विरोधात काम केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती गारटकर यांनी दिली होती.

या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडले. पुणे बाजार समितीसाठी ७२ टक्के इतके मतदान, तर ग्रामपंचायत मतदारसंघात ९६ टक्के एवढे विक्रमी मतदान झाले आहे. पुणे बाजार समितीची तब्बल २० वर्षांनी निवडणूक पार पडत आहे. यामुळे आता मतदानानंतर आता निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी बाजी मारणार की, सर्वपक्षीय पॅनेल करिश्मा दाखवणार हे उद्या निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT