Mahayuti and MVA Sarkarnama
पुणे

Pune Election : शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ काँग्रेसकडेच; उद्धव ठाकरेंना एकच जागा

Shivajinagar & Pune Cantonment Vidhan Sabha: शिवाजीनगर आणि कोथरुड, हडपसर मतदारसंघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दावा सांगितला होता.

Roshan More

Maharashtra Assembly Election : पुणे शहरातील आठ मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले आहे. महायुतीमध्ये कसबा, कोथरुड, खडकवासला, पर्वती, शिवाजीनगर मतदारसंघ भाजपकडे तर, वडगावशेरी,हडपसर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे.

महाविकास आघाडीत कसबा, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ काँग्रसकडे तर पर्वती, खडकवासला, हडपसर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आले आहेत. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे अवघा एकच मतदारसंघ कोथरुड आला आहे.

शिवाजीनगर आणि कोथरुड, हडपसर मतदारसंघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दावा सांगितला होता. मात्र, कोथरुड मतदारसंघ पक्षाला मिळाला असून चंद्रकांत मोकाटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

शिवाजीनगर मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सनी निम्हण इच्छुक होते. मात्र, ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली असून काँग्रेसने येथून दत्ता बहिरट यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या चौथ्यात यादीत पुणे कॅन्टोन्मेंटमधून माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

एकनाथ शिंदेंना एकही जागा नाही

महायुतीमध्ये पुणे शहरातील आठ मतदारसंघापैकी सहा जागा भाजपकडे तर दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला पुणे शहरातील एकही जागा आली नाही. हडपसरमधून शिंदेंच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे इच्छुक होते. मात्र, ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेली.

असा होणार सामान

मतदारसंघ - उमेदवार - विरुद्ध उमेदवार

खडकवासला - भीमराव तापकीर (भाजप) - सचिन दोडके (NCPSP)

पर्वती - माधुरी मिसाळ (भाजप) - अश्विनी जगताप (NCPSP)

कसबा - हेमंत रासने (भाजप) - रवींद्र धंगेकर (काँग्रेस)

शिवाजीनगर - सिद्धार्थ शिरोळे (भाजप) - दत्ता बहिरट (काँग्रेस)

कोथरुड - चंद्रकांत पाटील (भाजप) - चंद्रकांत मोकाटे (शिवसेना UBT)

पुणे काॅन्ट्रेनमेंट - सुनील कांबळे (भाजप) - अविनाश बागवे (काँग्रेस)

वडगाव शेरी - सुनील टिंगरे (NCP) - बापूसाहेब पठारे(NCPSP)

हडपसर - चेतन तुपे (NCP) - प्रशांत जगताप (NCPSP)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT